agriculture news in Marathi 49 licence for agriculture related industries Maharashtra | Agrowon

शेती संबंधीत उत्पादनाकरिता ४९ परवानगी पत्राचे वाटप 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील एमएआयडीसी उति संवर्धित रोपे तयार करणारे खाजगी युनिट, बियाणे खते व किटकनाशके उत्पादन करणारे खाजगी उद्योजक, ठिंबक सिंचन संच तयार करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

पुणे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील एमएआयडीसी उति संवर्धित रोपे तयार करणारे खाजगी युनिट, बियाणे खते व किटकनाशके उत्पादन करणारे खाजगी उद्योजक, ठिंबक सिंचन संच तयार करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ४९ कंपनीना उत्पादन व विक्री परवानगी पत्र तसेच वाहतुकीसाठी ७६ पास देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी दिली. 

जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. तथापी बियाणे यामध्ये अन्नधान्य, फळे, भाजीपाला बियाणे व उतिसंवर्धित रोपे, कलमे इ. सर्व जे पेरणी, लागवडीसाठी वापरतात यांचा समावेश होतो. खते यामध्ये संद्रीय, असेंद्रीय व मिश्र खतांचा समावेश होतो. अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ मध्ये समाविष्ट असल्याने पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांच्या आवश्यकतेमुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन, वाहतुक व विक्री ही अत्यावश्यक सेवेत असून त्यांना संचारबंदीतून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे. 

सध्या सर्व अधिनस्त कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील बियाणांचे दोन हजार १३६, खतांचे दोन हजार ४०२ व किटकनाशकांचे दोन हजार १९८ असे एकूण सहा हजार ७३६ अधिकृत परवाना धारक विक्रेत्यांना कळविण्यात आले असून सर्व विक्री केंद्रे त्याचे स्थानिक प्रशासनाकडील नियमांनुसार सुरळीत चालू करण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यामधील स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांनी त्यांनी या कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे व हवामान डेटाबेस अखंडीत चालु राहणे आवश्यक असल्याने परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध, नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे व सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणेच्या सुचना दिल्या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...