पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणी

पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणी
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणी

पुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल राहिली नाही. त्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पुरेशा प्रमाणात पेरण्या होऊ शकल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या, तरी पाण्याअभावी बहुतांशी जळून गेल्या. त्यामुळे पुणे विभागात हरभऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्केपर्यत घट येईल. मात्र, परतीच्या पावसाने ज्या गावात हुलकावणी दिली आहे, अशा तालुक्यात सुमारे ५० टक्केहून अधिक घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

पुणे विभागात हरभऱ्यांचे सरासरी २ लाख १७ हजार २२४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख सहा हजार ७५१ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विजय, विशाल यासारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली. 

यंदा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली. परंतु परतीचा पुरेसा पाऊस न झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता नाही.  परिणामी विभागात जवळपास एक लाख १० हजार ४७३ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले. 

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा विहीरी कोरड्या पडू लागल्याने अडचणीत आला आहे. पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. याशिवाय पाणी टंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात हरभऱ्यांच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रां सांगितले.

जिल्हानिहाय हरभरा पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के
नगर  १,१८,१०३  ४९,६६५ ४९
पुणे ५८,४२६  २३,१४१  ४०
सोलापूर ४०,६९५ ३३,९४५ ८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com