नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
अकोल्यात ४९७ गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता
अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये खर्च लागणार असून आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतरच तो अंतिम होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील ४९७ गावांसाठी ७१२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च सुद्धा प्रस्तावित करण्यात आला आहे.
जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या कालावधीसाठी सदर उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहीर, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विहीर अधिग्रहण आदी योजनांचा समावेश आहे.
- 1 of 1096
- ››