agriculture news in marathi 5. 27 lakh hectare Sowing planned in Parbhani | Agrowon

परभणीत सव्वा पाच लाख हेक्टरवर पेरणी नियोजित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात ५ लाख २७ हजार २२० हेक्टरवर पेरणी नियोजित आहे.

परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात ५ लाख २७ हजार २२० हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन २ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी आणि कपाशीच्या क्षेत्रात घट होऊन २ लाख हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणीसाठी  ७१ हजार ८४० क्विंटल बियाण्याची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे’’, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र लाख २३ हजार ३६२ हेक्टर आहे. यंदा ५ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. कडधान्य पिकांमध्ये तुरीच्या क्षेत्रात वाढ, तर मूग, उडदाच्या क्षेत्रात घटीची शक्यता आहे. तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी च्या क्षेत्रातील घट यंदाही कायम राहील, असा अंदाज आहे.

सोयाबीन क्षेत्रानुसार एकूण १ लाख ८० हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्रामबिजोत्पादन मोहिमेव्दारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतः राखून ठेवलेले बियाणे स्थानिक पातळीवर एकूण १ लाख २३ हजार ६०० क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. उर्वरित बियाण्याची गरज भागविण्यासाठी ६० हजार ६०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. 

महाबीजकडे ३० हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार क्विंटल, खासगी कंपन्यांकडे २५ हजार ६०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. अन्य पिकांमध्ये तुरीचे २ हजार ४०१ क्विंटल, मुगाचे २ हजार ५२० क्विंटल, उडदाचे  ८४० क्विंटल, ज्वारीचे ३०४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...