आटपाडी तालुक्‍यात कर्जमाफीचे २१ कोटी रुपये जमा

5 crore rupees of loan waiver deposits in Atpadi taluka
5 crore rupees of loan waiver deposits in Atpadi taluka

आटपाडी, जि. सांगली : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन लाखांच्या आतील ४०७० पात्र शेतकऱ्यांपैकी तीन हजार पाचशे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत २१ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. 

महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांच्या आतील जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकेतील ४६०० शेतकऱ्यांनी प्रकरणे माफीसाठी दाखल केली होती. यातील ४२५९ प्रकरणांचे प्रमाणीकरण झाले होते. जिल्हा बॅंक आणि विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या विविध त्रुटीतून ४०७१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यात जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकद्वारे त्यांना २७ कोटी ११ लाखांची कर्जमाफी मिळाली. यातील जिल्हा बॅंकेच्या तीन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून १७ कोटी ३४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर आत्तापर्यंत जमा झाले आहेत.

राष्ट्रीयीकृत बॅंकेतील ५२६ शेतकऱ्यांना चार कोटी ११ लाख रुपये त्यांच्या कर्ज खात्यावर जमा झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर २१ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेत सप्टेंबरनंतरची व्याजाची आकारणी करण्यावरून संभ्रमावस्था होती. मात्र शासनाने अशी व्याज आकारणी बॅंका आणि सोसायटीने करू नये, असे स्पष्ट आदेश दिले. 

१८० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी  

पात्र झालेल्या ४००० शेतकऱ्यांपैकी फक्त १८० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. ते झाल्यानंतर त्यांच्याही कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. आतापर्यंत आलेल्या तक्रारी पैकी ७० तक्रारी निकालात काढल्या आहेत. चौदा प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे वारस नोंद संबंधित प्रलंबित आहेत. तीही लवकरच निकालात काढली जातील, असे सहायक निबंधक बी. डी. मोहिते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com