agriculture news in Marathi 5-pronged strategy to help farmers during lockdown Maharashtra | Agrowon

पाचसुत्री धोरणातून शेतकऱ्यांना सक्षम करा 

वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

कोरोनामुळे सुुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना  पाचसुत्री धोरणांचा अवलंब करावा, असा सल्ला प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी दिला. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे सुुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना पीक सल्ला, शेतमाल साठवणुकीची सुविधा, बियाणे उपलब्धता, महिला शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि शेतमाल प्रक्रिया यंत्रांची उपलब्धता या पाचसुत्री धोरणांचा अवलंब करावा, असा सल्ला प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी दिला. 

केंद्र सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक फटका बसत आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना पाचसुत्री धोरण सुचविले आहे. एम.एस.स्वामिनाथन फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. 

‘‘किड-रोगांवर घ्यावी लागणारी काळजी, जमिनिचे आणि झाडांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी शेतकऱ्यांना पुरक कृषी सल्ला देण्यात यावा. हे मानवी आरोग्यासाठीही चांगले आहे. तसेच या काळात शेतकऱ्यांना शीतगृह अथवा इतर साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून बाजार सुरु होईपर्यंत शेतकऱ्यांना आपला माल साठविता येईल,’’ असे त्यांनी म्हटले आहे. 

‘‘दुधाच्या बाबतीत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (एनडीडीबी) या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन विकास बोर्डाने याबाबत पुढाकार घेऊन काम करावे. येणाऱ्या खरिप हंगामात अल्प भूधारक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी तसेच जमिन आणि पाण्याचा पुरपूर वापर करण्यासाठी त्रिमितीय पीक पध्दतीसारख्या तंत्राचा अवलंब करावा,’’ असे स्वामिनाथन यांनी सुचविले आहे. 

देशातील शेती आणि संलग्न क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. श्‍वेत क्रांती हे याचे उत्तम उदाहरण आहे, असा दाखल देत ते म्हणाले, ‘‘महिला शेतकरी फलोत्पादनातही पुढे आहेत. या महिलांना समोर ठेवून या संकटाच्या कमी हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरसहित तांत्रिक आणि पतपुरवठ्यासारख्या आर्थिक सबलीकरणाचे काम करावे. तसेच शेतमालाची विक्री साखळीत मुल्यवर्धनासाठी तेल काढणीसाठी लागणारी यंत्रे किंवा फळांपासून ज्युस तयार करण्यासाठी लागणारी यंत्रे, अशा आवश्‍यक यंत्रांची उपलब्धता असावी.’’ 

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना अशी मदत केल्यास लहान क्षेत्रधारक शेतकरी फलोत्पादन क्रांती घडून येईल, असे एम. एस. स्वामिनाथन यांनी नमुद केले. 

एम. एस स्वामिनाथन म्हणतात... 

  • शेतकऱ्यांना पुरक कृषी सल्ला देण्यात यावा 
  • शीतगृहे, इतर साठवणुकीची सुविधा उपलब्ध करा 
  • चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी 
  • महिला शेतकऱ्यांचे तांत्रिक आणि आर्थिक सबलीकरण करावे 
  • शेतमाल मुल्यवर्धनासाठी आवश्‍यक यंत्रे उपलब्ध व्हावीत 
     

इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...