मराठवाड्यात अर्धा कोटी जनतेची तहान टॅंकरवर

मराठवाड्यात अर्धा कोटी जनतेची तहान टॅंकरवर
मराठवाड्यात अर्धा कोटी जनतेची तहान टॅंकरवर

औरंगाबाद : झपाट्याने टॅंकरग्रस्त गावांची संख्या वाढणारा मराठवाडा टॅंकरवाडा बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अर्धा कोटीवर लोकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सर्वाधिक टॅंकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून, या जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्येची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. बीड व जालना जिल्ह्यांतही टॅंकरची संख्या कमी नसल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २२८६ गाव व ७८५ वाड्यांमधील ५१ लाख ४१ हजार ४५० लोकांची तहान टॅंकरशिवाय भागणे कठीण बनले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७४९ गावे व २७१ वाड्यांमधील १८ लाख ७६ हजार २९६ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. ही तहान भागविण्यासाठी तब्बल ११३१ टॅंकर सुरू करण्यात आले आहे. 

जालना जिल्ह्यातील ११ लाख २४ हजार ७३८ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. ५०७ गावे व ११६ वाड्यांमधील या लोकांची तहान भागविण्यासाठी ६३३ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील ६३२ गाव  ३२९ वाड्यांमधील १२ लाख १८ हजार १२५ लोकांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. ही तहान भागविण्यासाठी ९०८ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील ६८ गावे व १६ वाड्यांमधील १ लाख ७३ हजार ५२५ लोकांची तहान टॅंकरवर भागविली जात आहे. त्यासाठी ८६ टॅंकरच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १४८ गावे व १० वाड्यांमधील ३ लाख ७२  हजार २४९ लोकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ही तहान भागविण्यासाठी २०७ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील ७१ गावे व ९ वाड्यांमधील १ लाख २५ हजार १७ लोकांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. त्यासाठी ८६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३३ गाव व ८ वाड्यांमधील टंचाईचा सामना करणाऱ्या ५६ हजार ३५० लोकांची तहान भागविण्यासाठी ५२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ७८ गावे व २६ वाड्यांमधील १ लाख ९५ हजार १५० लोकांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. ही तहान भागविण्यासाठी १२४ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरींची संख्या
औरंगाबाद ५६१
जालना ६७७
परभणी ३७१
हिंगोली ४८३
नांदेड ६७५
बीड ९५४
लातूर ८७९
उस्मानाबाद ९२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com