कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पात पन्नास टक्के पाणीसाठा

चिकोत्रा प्रकल्पात पन्नास टक्के पाणीसाठा
चिकोत्रा प्रकल्पात पन्नास टक्के पाणीसाठा

सेनापती कापशी, जि. कोल्हापूर : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने अजून दोन आवर्तने व्यवस्थित पूर्ण होणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही गेल्या वर्षी इतकी टंचाई भासणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. 

गेल्या पावसाळ्यात १५२० दशलक्ष घनफूट क्षमतेचा प्रकल्प पूर्ण भरला. त्याशिवाय साठणारे जादा पाणी सोडले जाणार होते. सुमारे दीडशे दशलक्ष घनफूट पाण्याची एक फुटाची पातळी वाढली होती. ते जादा पाणी पावसाचे प्रमाण वाढल्यास दरवाजे उचलून सोडले जाणार होते. मात्र, त्या नंतर एकदम पाऊस कमी झाल्याने ते पाणी सोडलेच नाही. यामुळे एका आवर्तनाइतके पाणी जादा साठून राहिले. त्याचा फायदा आता होत आहे. प्रकल्पात आता ८०० दशलक्ष पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या १४ एप्रिलमध्ये सहाव्या आवर्तनाचे पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर १६ मेला सातवे आवर्तन आणि पुढील पावसाची परिस्थिती पाहून आठव्या राखीव आवर्तनाचा विचार होईल. 

प्रत्येक आवर्तनावेळी पहिल्या क्रमांकाच्या बंधाऱ्यापासून बेळुंकीच्या २८ व्या बंधाऱ्यापर्यंत पाणी साधारणपणे आठ दिवसांत पोचणे अपेक्षित असते. मात्र, तसे कधीही झाले नाही. या आवर्तन काळात चिकोत्रा नदीकाठावर उपसबंदी राहते. आतापर्यंत ती कागदावरच राहिली आहे. याबाबत बैठक घेऊन उपसाबंदी शंभर टक्के यशस्वी झाली पाहिजे, अशी सूचना कालवा समितीने पाटबंधारे व वीज वितरणला दिली होती. 

या समितीच्या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ आणि पाटबंधारे व वीज कंपनीचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. अंमलबजावणीपासून मात्र हे अधिकारी कोसो दूर आहेत. कोण चुकतो याच्यावर चर्चा करण्यापेक्षा सर्वांनी मिळून पाणी वाचवण्याची गरज आहे.

वीजनिर्मिती १० दिवस  चिकोत्रा प्रकल्पावर प्रत्येक आवर्तनावेळी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती होते. ही निर्मिती सुमारे महिन्यातून एकदा दहा दिवस सुरू राहते. बीओटी बांधा वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर हा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com