agriculture news in Marathi 50 percent water storage in dams in Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५० टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५०.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत प्रकल्पातील पाणीसाठ्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५०.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत प्रकल्पातील पाणीसाठ्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गत आठवड्यात ३ ऑगस्टअखेर मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४४ टक्के होता. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ५१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ४० टक्के, ७४९ लघू प्रकल्‍पात २३ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ५७ टक्के तर तेरणा-मांजरा-रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात १९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश होता. ७ ऑगस्टअखेर ११ मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५७.८८ टक्क्यांवर तर ७५ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ४७.१५ टक्के, ७४९ लघू प्रकल्पातील पाणीसाठा २७.८२ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामधील पाणीसाठा ६२.०८ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील बंधाऱ्यात मधील पाणीसाठा २१.६९ टक्के झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

१६३ प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा
मराठवाड्यातील लघू-मध्यम प्रकल्पांपैकी १६३ प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे.त्यामध्ये औरंगाबाद मधील ९, जालना ४, बीड २ तर उस्मानाबाद, नांदेड मधील प्रत्येकी ३ मिळून २१ मध्यम तसेच औरंगाबाद मधील ४५ ,बीडमधील ४०, जालना ६, लातूर ११, उस्मानाबाद ८, नांदेड १३, परभणी ४, तर हिंगोली जिल्ह्यातील १५ मिळून १४२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

२६३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली
७५ मध्यम प्रकल्पांपैकी १६ तसेच ७४९ लघू प्रकल्पांपैकी २४७ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखालीच आहेत. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबाद,जालन्यातील प्रत्येकी १, बीडमधील ४, लातूरमधील ३ तर उस्मानाबाद मधील ७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या लघुप्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील १३, जालना २१,बीड २६, लातूर ४६, उस्मानाबाद ११५, नांदेड १८ तर परभणी जिल्ह्यातील ८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

६८ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७४९ लघू प्रकल्पांपैकी ६८ लघू, मध्यम प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामध्ये बीड, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी २ मध्यम प्रकल्पांसह उस्मानाबाद मधील एक तसेच औरंगाबादमधील ५, बीडमधील १३,लातूरमधील २६ , उस्मानाबादमधील १९ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...