नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेसतरा हजारांवर वीजजोडण्या प्रलंबित

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेसतरा हजारांवर वीजजोडण्या प्रलंबित
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेसतरा हजारांवर वीजजोडण्या प्रलंबित

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार ९६३ कृषी पंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. त्यांना उच्चदाब वीज प्रणाली, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोड देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

नांदेड जिल्ह्यात २०१८ च्या मार्चअखेरपर्यंत महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरलेल्या ६ हजार ८२६ कृषी पंपांच्या जोडण्या प्रलंबित राहिल्या. २०१८-१९ मध्ये ७१३ नवीन शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. त्यापैकी ५४४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना वीज जोडण्या मिळाल्या. त्यामुळे मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात ६ हजार ९९५ कृषिपंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी सहा महिन्यांत २ हजार ७९८, त्यापुढील सहा महिन्यांत ४ हजार १९७ कृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे नियोजन आहे.

परभणी जिल्ह्यात मार्च २०१७ अखेर ३ हजार ३१७ वीज जोडण्या प्रलंबित राहिल्या. २०१७-१८ मध्ये ३ हजार ३१७ आणि नवीन ७४१ असे एकूण ४ हजार ११८ कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या. २०१८-१९ मध्ये ४ हजार ५५३ कृषिपंपाना जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. गतवर्षी १०७ ठिकाणी रोहित्र बसविण्यात आली.

मार्च २०१८ नंतर प्रलंबित राहिलेल्या कृषिपंपाना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतंर्गत वीज जोडण्या मिळतील. या योजनेतंर्गत ५ हजार ५२६ शेतकऱ्यांंनी महावितरण कंपनीकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी २ हजार २४३ अर्जांना मंजुरी देण्यात आली. १ हजार ९१६ शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमुळे नाकारण्यात आले. उर्वरित १ हजार ३६७ अर्जाचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

हिंगोलीत मार्च २०१८ अखेरपर्यंत कृषी पंपाच्या वीजग्राहकांची संख्या ७१ हजार ६२६ एवढी होती. अनामत रक्कम भरून वीज जोडण्या प्रलंबित असलेल्या कृषी पंपांची संख्या ५ हजार १०२ एवढी होती. २०१८-१९ मध्ये सौर कृषी पंप योजनेंतर्गत १ हजार ७३ अर्ज आले. गेल्यावर्षी २७२ शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली. मार्च २०१९ अखेर ५ हजार ४४२ कृषी पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित राहिल्या.

जोडणीसाठी जवळचे अंतर असल्यास उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे दोन शेतकऱ्यांमध्ये एक उच्चदाब रोहित्र देऊन जोडण्या दिल्या जात आहेत. सध्य स्थितीतील रोहित्रांपासून सहाशे मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौरस कृषिपंप योजनेद्वारे जोडण्या मिळत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com