Agriculture news in marathi; 50 thousand rs. fruits of orange garden were stolen | Agrowon

संत्रा बागेतील ५० हजारांची फळे गेली चोरीला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

अमरावती  ः बागेतील संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्‍यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यानंतरही बागेतील फळे चोरी जाण्याच्या घटना नियंत्रणात आल्या नाहीत. शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका बागेतून चोरट्यांनी तब्बल ४५ ते ५० हजार रुपयांच्या संत्रा फळांची चोरी केली. 

अमरावती  ः बागेतील संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्‍यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यानंतरही बागेतील फळे चोरी जाण्याच्या घटना नियंत्रणात आल्या नाहीत. शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका बागेतून चोरट्यांनी तब्बल ४५ ते ५० हजार रुपयांच्या संत्रा फळांची चोरी केली. 

अमरावती ग्रामीण पोलिसांनी वाढत्या संत्रा, मोसंबी फळांच्या चोरीच्या घटनांमुळे सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर पोलिसांनी एका मालवाहू वाहनासह तब्बल पाच जणांच्या टोळक्‍यास अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली ही दिली. याच टोळीतील तीघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 

गुन्हेगारांचे टोळके पोलिसांच्या जाळ्यात असतानाच शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा चोरीची घटना घडली आहे. दिवसेंदिवस चौरीचे प्रकार वाढतच असल्याने संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. 

करजगाव शिवारातील एका बागेतून चोरट्यांनी पुन्हा संत्र्या बागेला टार्गेट करीत फळे लंपास केली. मनोज हिंमतराव तडस यांच्या बागेतील १२ ते १५ हजार फळे पळविण्यात आली. त्याची किंमत ४५ ते ५० हजार रुपये असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. 

बागेतून फळ चोरीच्या घटनांमध्ये नजीकच्या काळात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी संत्रापट्ट्यात होत आहे.

टॅग्स

इतर बातम्या
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
इराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा...मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे...कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
नाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार...नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष...
स्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय...नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद...
धुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे...धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा...
सांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीतसांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर...
जळगावच्या नियोजन आराखड्यात वाढजळगाव : जिल्ह्यातील वार्षिक योजनेसाठी २०२०-२१...
यवतमाळ जिल्हा बॅंकेची १२ वर्षांनंतर...यवतमाळ ः गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा...
शेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने...अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...