नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याची शक्यता

राज्यातील नियमित कर्जदारांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. राज्यात सुमारे ४५ लाख नियमित कर्जदार असून, पूर्वीच्या कर्जमाफीच्या तुलनेत आता नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ होईल. जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती मागवून घेऊन संबंधित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. - डी. एस. साळुंखे, विभागीय सहनिबंधक, पुणे
loan waiver scheme
loan waiver scheme

सोलापूर : राज्य सरकार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची शक्यता आहे. राज्यातील ४४ लाख ७० हजार नियमित कर्जदार असून, यासंदर्भातील निर्णय झाल्यास तब्बल २३ हजार कोटी रुपये याकरिता लागतील, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी (ता. २१) प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते. राज्यातील एक कोटी ५३ लाख शेतकऱ्यांपैकी १ कोटी ८ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांची तब्बल १ लाख ३५ हजार कोटींची येणे बाकी आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि पश्‍चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम अशा पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वाधिक थकबाकी आहे.  सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये, तर नियमित कर्जदारांसाठी सुमारे २३ हजार कोटी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. राज्याची स्थिती

  •  एकूण शेतकरी : १.५३ कोटी
  •  येणे बाकीदार शेतकरी : १.०८ कोटी
  •  एकूण येणे बाकी : १ लाख ३५ हजार कोटी
  •  नियमित कर्जदार : ४४.७० लाख
  •  नव्या कर्जमाफीची अंदाजित रक्‍कम : ६३ हजार कोटी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com