मुंबईत आरोग्य विभागातील ५० टक्के पदे रिक्त 

मुंबई महापालिकेच्याआरोग्य विभागात ५० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक कबुली पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत आरोग्य विभागातील ५० टक्के पदे रिक्त 50% vacancies in health department in Mumbai
मुंबईत आरोग्य विभागातील ५० टक्के पदे रिक्त 50% vacancies in health department in Mumbai

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्ष करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून आरोग्य विभागातील रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आरोग्य विभागात ५० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक कबुली पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.   सर्वपक्षीय सदस्यांनी डॉक्‍टरांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यावर आक्षेप घेतला. या निर्णयामुळे तरुण डॉक्‍टरांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. महापालिकेची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असून, रिक्त पदे भरण्यासाठी महापालिकेने कोणते प्रयत्न उपाय केले, या बाबत श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. सत्ताधाऱ्यांचा भ्रमाचा भोपाळा फुटला असून, डॉक्‍टरांची तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फक्त निवृत्तीचे वय वाढवून प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत; मात्र त्यांना मिळणारे वेतन खासगी रुग्णालयाच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे नवे तज्ज्ञ उच्च शिक्षित डॉक्‍टर पालिकेच्या सेवेत येत नाहीत, असेही या वेळी सदस्यांनी लक्षात आणून दिले. 

एक लाख नागरिकांसाठी ५४ डॉक्‍टर  महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मुंबईतील एक लाख नागरिकांसाठी अवघे ५४ डॉक्‍टर उपलब्ध असल्याची माहिती नमूद केली होती. शांघायमध्ये एक लाख नागरिकांमागे २९६ डॉक्‍टर, टोकियोमध्ये २८२ डॉक्‍टर, न्यूयॉर्कमध्ये हे प्रमाण ३९३ आणि बीजिंगमध्ये ३५५ एवढे आहे. 

भूलतज्ज्ञांचा अभाव  शस्त्रक्रियांसाठी भूलतज्ज्ञांची आवश्‍यकता असते; मात्र कमतरतेमुळे खासगी रुग्णालयातून भूलतज्ज्ञ बोलवावे लागतात. अनेक वेळ भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर पडतात. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो, असे शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी नमूद केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com