Agriculture news in Marathi 500 to 2300 per quintal of onion in the state | Agrowon

राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

कोरोनामुळे गेले काही दिवस बंद असलेले आठवडी बाजार गावागावात भरत असल्याने कांदा उठाव वाढत आहे. येत्या काळात हे दर सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. बाजारात कांद्याची किरकोळ विक्री १५ ते २५ रुपयांदरम्यान प्रतिकिलोने केली जात आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये
अकोला ः येथील बाजारपेठेत कांद्याला सहाशे ते १६०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. दुय्यम दर्जाचा कांदा ६०० ते १००० पर्यंत विकत आहे. तर मध्यम ते उच्च दर्जाचा कांदा १००० ते १६०० दरम्यान विकल्या जात आहे. सरासरी १००० ते ११०० दरम्यान कांद्याला भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. येथील बाजारपेठेत कांद्याची दिवसाला २० ते २२ टनांची आवक होत आहे. बाजारात स्थानिक भागातील कांदाच सर्वाधिक विक्रीसाठी येत आहे. दुय्यम व मध्यम दर्जाचा कांद्याची अधिक आवक होत आहे. कोरोनामुळे गेले काही दिवस बंद असलेले आठवडी बाजार गावागावात भरत असल्याने कांदा उठाव वाढत आहे. येत्या काळात हे दर सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. बाजारात कांद्याची किरकोळ विक्री १५ ते २५ रुपयांदरम्यान प्रतिकिलोने केली जात आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक २३०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २३०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक रोज ५० ते ८० गाड्यापर्यंत आवक राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला मागणी असल्याने कांद्याचे दर किंचित वधारले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ९०० रुपये, सर्वाधिक २३०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक तशी जेमतेमच राहिली. पण मागणी टिकून होती. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १५० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या पंधरवड्यातही कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी ९५० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा दरातील चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सांगलीत सरासरी १५५० रुपये प्रतिक्विंटल
सांगली  : येथील विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात कांद्याची कमी अधिक आवक आहे. गुरुवारी (ता. १७) कांद्याची १०६५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १००० ते २१००, तर सरासरी १५५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. बुधवारी (ता. १६) कांद्याची १९१७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २१००, तर सरासरी १४०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १५) कांद्याची १३५५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २१००, तर सरासरी १३०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १४) कांद्याची १८०५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १००० ते २३००, तर सरासरी १६५० रुपये असा दर होता.

औरंगाबाद येथे सरासरी १०५० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) कांद्याची २५५६ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी १०५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १० जूनला कांद्याची २०१० क्‍विंटल आवक झाली. या कांद्याचे सरासरी दर ९५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ जूनला १४१३ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १०२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. १३ जूनला १८७० क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १४ जूनला कांद्याची आवक १५०३ क्विंटल, तर सरासरी दर १०५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ जूनला १०८७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १०५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. सोळा जूनला १०५७ क्विंटल कांद्याची आवक झाली. तर सरासरी दर १०२५ पंचवीस रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

जळगावात ८५० ते १५५० रुपये प्रतिक्विंटल
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १७) ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटल ८५० ते १५५० व सरासरी १२०० रुपये एवढा मिळाला. आवक जामनेर, जळगाव, यावल, चोपडा आदी भागांतून होत आहे. 

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते २१०० रुपये
कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची ६००० ते ७००० पोत्यांची आवक होत आहे. कांद्यास प्रति दहा किलोस ५० ते २१० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवकेत काहीशी वाढ होत आहे. अजूनही लॉकडाउनचा परिणाम जाणवत असल्याने कांद्याची विक्री अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजार समितीत नगर, नाशिक, पुणे, सोलापूर भागांतून कांद्याची आवक होत आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल १४०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील मार्केटमध्ये आठवड्यातील मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होत असते. दरात तेजी आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तसेच अन्य ठिकाणाहून होणारी कांद्याची आवक सध्या बंद असल्यामुळे एकूण आवक कमी आहे. सध्या स्थानिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. शनिवारी (ता. १२) कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १५) कांद्याची १२५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १७) शहरातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री १५ ते २५ रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी सुरेश गव्हाणे यांनी सांगितले.

नागपुरात प्रतिक्विंटल १३०० ते १६०० रुपये
नागपूर : कळमना बाजार समितीत पांढऱ्या आणि लाल कांद्याची नियमित आवक आहे. विदर्भासह नाशिक जिल्ह्यातून देखील कांद्याची आवक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज सरासरी २००० क्विंटलपेक्षा अधिक आवक बाजार समितीत होत आहे. बाजारात पांढऱ्या  कांद्याचे दर १३०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल होते. लाल कांद्याचे व्यवहार १७०० ते २२०० रुपये चिंतामणी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशमध्ये देखील कांदा लागवड क्षेत्र असून छिंदवाडा भागातून कळमना बाजार समितीत कांद्याची आवक होत आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो २५ रुपये दराने विकला जात आहे. पांढऱ्या कांद्याचे दर २० रुपये किलो होते. ग्राहकांकडून पांढऱ्या ऐवजी लाल कांद्याला अधिक मागणी राहते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात कांदा क्विंटलला ३०० ते २३००...पुण्यात प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये पुणे...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात घेवडा १५०० ते ६५०० रुपयेसांगलीत प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये...
‘लॉकडाउन’चे निर्बंध शिथिल;  अकोल्यात... बोर्डी, जि. अकोला : कोरोनाची दुसरी लाट...
नगरला शेवगा, घेवड्याला चांगला दर; आवक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबांची आवक वाढली; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमना बाजार समितीत सोयाबीन दरातील...नागपूर : सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. कळमना...
राज्यात वांगी ५०० ते ४००० रुपये क्विंटलपुण्यात प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये...
पुण्यात भाजीपाल्याची आवक संतुलितपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात केळी ६०० ते १५०० रुपयेसांगलीत क्विंटलला १२५० ते १३५० रुपये ...
नगरमध्ये शेवग्यासह दोडका दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कळमण्यात मोसंबीला ५००० ते ६५०० रुपयेनागपूर : कळमना बाजार समितीत सद्यःस्थितीत मोसंबीची...
हिरवी मिरची, कोबी, मटारच्या दरात वाढ  पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...