agriculture news in Marathi 500 crore fund for banks to distribute loan Maharashtra | Agrowon

कर्जवाटपासाठी जिल्हा बॅंकांना ५०० कोटीचा निधी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

रिझर्व्ह बॅंकेने खरिपासाठी २५ हजार कोटी रुपये नाबार्डला दिले आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ५०० कोटी रुपये आले आहेत. ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी देशात सर्वात आधी राज्य शिखर बॅंकेने पाऊल टाकले. आम्ही व्याज भरून ही रक्कम ताब्यात घेतली. राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करता यावे हा हेतू त्यामागे आहे. एरवी आमच्याकडे निधीची मागणी बॅंका करतात. मात्र, यंदा शिखर बॅंकेनेच या बॅंकांना निधी घेवून जाण्याविषयी कळविले आहे. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, राज्य शिखर बॅंक. 

पुणे: लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना खरिपाकरीता वेळेत कर्ज मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना तातडीने ५०० कोटीचा कर्ज निधी देण्याचा निर्णय शिखर बॅंकेने घेतला आहे. 

‘‘जिल्हा बॅंकांनी गेल्या खरिपात शिखर बॅंकेकडून सहा हजार कोटीचे कर्ज घेतले होते. यंदा देखील आम्ही भरपूर तरतुद केली आहे. बॅंकांचे प्रस्ताव येताच कर्ज वाटप केले जाईल. त्यासाठी आम्ही नाबार्डकडून धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील ५०० कोटीचा निधी आम्ही जिल्हा बॅंकांकडे दोन दिवसात वर्ग करणार आहोत,’’ अशी माहिती शिखर बॅंकेच्या सूत्रांनी दिली. 

लॉकडाऊनमुळे डळमळीत झालेल्या कृषी पत पुरवठा व्यवस्थेला आधार देण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने दोन आठवडयापूर्वी केली होती. त्यानुसार, सहकारी व ग्रामीण बॅंका तसेच सुक्ष्म आर्थिक पुरवठा संस्थांना २५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला हा निधी दिला आहे. 

४.८ टक्के व्याजदराने देणार निधी 
नाबार्डच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप सुलभ होण्यासाठी देशातील विविध सहकारी बॅंकांना पुनर्वित्त निधी (रिफायनान्स फंड) वाटण्यासाठी ही लगबग सुरू आहे. हा कर्ज निधी ४.८ टक्के व्याज दराने बॅंकांना मिळणार आहे. 

‘‘नाबार्डने आतापर्यंत १२ हजार ७६७ कोटी रुपये पुनर्वित्त योजनेखाली विविध बॅकांना उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्रात शिखर बॅंकेने इतर राज्यांच्या आधी मागणी नोंदविली. त्यामुळे जवळपास ५०० कोटीचा निधी शिखर बॅंकेच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसाठी उपलब्ध झाला आहे,’’ अशी माहिती नाबार्डच्या सूत्रांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...