जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रोमनी
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये दर
जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.
जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन, दुग्ध व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून जालना बाजार समितीच्या आवारात २१ एप्रिल २०१८ रोजी रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. या बाजार समितीमध्ये १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान जवळपास २१३ टन रेशीम कोषांची आवक झाली. जवळपास २६८५ रेशीम कोष उत्पादक शेतकरी घेऊन आलेल्या या रेशीम कोषांना सरासरी ३१५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.
जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजाराच्या आजवरच्या कार्यकाळात १० जानेवारी २०२० हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. या दिवशी बाजार समितीमध्ये १४ क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली. या कोषांना १६५०० ते ५०००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर रेशीम कोष उत्पादकांना मिळाले. जळगाव जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला ५०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर काही शेतकऱ्यांच्या कोषाला ४६५ तर काहींच्या कोषाला ४८५ रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याची माहिती रेशीम कोष बाजारपेठेच्या वतीने देण्यात आली.
खरेदीदार प्रल्हाद मोहिते यांनी लिलावामध्ये जास्तीची बोली लावून शेतकरी संदीप पाटील व राहुल पाटील यांच्या ८७ किलो ९८ ग्रॅम वजनाच्या रेशीम कोषाला ५० हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर दिल्याचेही बाजार समितीने स्पष्ट केले.
या उच्चांकी दर व खरेदीसाठी बाजार समितीच्या वतीने खरेदीदार प्रल्हाद मोहिते यांचा बाजार समितीचे लेखापाल प्रभाकर जाधव यांच्या हस्ते तर शेतकरी संदीप पाटील यांचा प्रभारी सचिव रजनीकांत इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसह खरेदीदार, व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी मोहन राठोड, अनिल खंडाळे, संजय छबीलवाड, अशोक कोल्हे, भरत तनपूरे, रेशीम विभागाचे कर्मचारी भरत जायभाये, गणेश कड उपस्थित होते.
- 1 of 29
- ››