agriculture news in Marathi 500 rupees kg rate for silk in Jalna Maharashtra | Agrowon

जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जानेवारी 2020

जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. 

जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. 

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन, दुग्ध व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून जालना बाजार समितीच्या आवारात २१ एप्रिल २०१८ रोजी रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. या बाजार समितीमध्ये १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान जवळपास २१३ टन रेशीम कोषांची आवक झाली. जवळपास २६८५ रेशीम कोष उत्पादक शेतकरी घेऊन आलेल्या या रेशीम कोषांना सरासरी ३१५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. 

जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजाराच्या आजवरच्या कार्यकाळात १० जानेवारी २०२० हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. या दिवशी बाजार समितीमध्ये १४ क्‍विंटल रेशीम कोषाची आवक झाली. या कोषांना १६५०० ते ५०००० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंतचे दर रेशीम कोष उत्पादकांना मिळाले. जळगाव जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला ५०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर काही शेतकऱ्यांच्या कोषाला ४६५ तर काहींच्या कोषाला ४८५ रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याची माहिती रेशीम कोष बाजारपेठेच्या वतीने देण्यात आली.

खरेदीदार प्रल्हाद मोहिते यांनी लिलावामध्ये जास्तीची बोली लावून शेतकरी संदीप पाटील व राहुल पाटील यांच्या ८७ किलो ९८ ग्रॅम वजनाच्या रेशीम कोषाला ५० हजार रुपये प्रतिक्‍विंटल इतका दर दिल्याचेही बाजार समितीने स्पष्ट केले. 

या उच्चांकी दर व खरेदीसाठी बाजार समितीच्या वतीने खरेदीदार प्रल्हाद मोहिते यांचा बाजार समितीचे लेखापाल प्रभाकर जाधव यांच्या हस्ते तर शेतकरी संदीप पाटील यांचा प्रभारी सचिव रजनीकांत इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसह खरेदीदार, व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी मोहन राठोड, अनिल खंडाळे, संजय छबीलवाड, अशोक कोल्हे, भरत तनपूरे, रेशीम विभागाचे कर्मचारी भरत जायभाये, गणेश कड उपस्थित होते. 


इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...