नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला विक्रीच्या प्रतिक्षेत

बाजार समित्या तसेच वाहतुक बंद असल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि भाजीपाला शेतकऱ्यांना विक्री करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोठ्या शहरात पालिकांच्या मदतीने त्यासाठी जागा उपलब्ध केल्या जात आहेत. अडचण आली तर कृषी विभागाशी संपर्क करता येईल. - शिवाजीराव जगताप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर
vegetablevegetable
vegetablevegetable

नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे विक्री करता न आल्याने नगर जिल्ह्यामध्ये सध्या सुमारे पाचशे टन भाजीपाला शेतात पडून आहे. कृषी विभागाने केलेल्या माहिती संकलनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हा भाजीपाला मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना विक्री करता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून पालिकांच्या मदतीने जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. 

कोरोना व्हारसचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद पाळला जात आहे. सर्व वाहतुक व्यवस्था बंद आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यात सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आठ दिवसांपासून बाजार समित्याही बंद आहेत. त्याचा गंभीर परिणाम भाजीपाला उत्पादकांवर झाला असून भाजीपाला विकता येत नसल्याने तो शेतात सडतो आहे. 

लॉकडाऊन झाल्यापासून नेमका किती भाजीपाला सध्या उपलब्ध आहे याचे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संकलन केले. त्यातुन मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (ता.२८) पर्यंत जिल्हाभरात सुमारे पाचशे टन भाजीपाला सध्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात शेवगा, कोबी, सिमला मिरची, मेथी, टोमॅटो, बटाटे अधिक आहेत. तीन दिवस पावसाचा फटका बसलेल्या तालुक्यातच भाजीपाला उपलब्धतेचे प्रमाण अधिक आहे. 

कृषी विभागाने शेतात पडून असलेला माल शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी नगरसह जिल्ह्यामधील मोठ्या शहरात विक्री करता येणार असून त्यासाठी पालिकांकडून प्रमुख ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तेथील सुरक्षिततेच्या पाश्वभूमीवर पालिकेचे कर्मचारी असतील, असे आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने संपर्क मदत क्रमांक उपलब्ध करुन दिले असून शेतकऱ्यांनी अडचणीच्या वेळी कृषी विभागाच्या ९१७२५२०८८७, ९४२२४४५८११, ९४२१५५८८३४, ९३७०६३८११३, ७०२०८७६५१९, ७५८८०३०७२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. 

विक्रीसाठी उपलब्ध भाजीपाला (टनांत)  शेवगा ः १८१, कोबी ः १७, फ्लॉवर ः ७, काकडी ः ११, गवार व वाटाना प्रत्येकी ः २, मिरची, दोडका, वाल, कारली प्रत्येकी ः ४, वांगी ः १५, दुधी भोपळा ः ३, वाटाना ः२, लसूण, कांदापात, शेपू, घोसाळे प्रत्येकी ः१, मेथी ः२२, बाटाटे ः१६, आले (आद्रक) ः ५३, ढेमसे ः दिड टन, सिमली मिरची ः २१, हळद, चवळी, गाजर, करडई भाजी, डांगर, धने प्रत्येकी ः ५०० किलो, टोमॅटो ः ३३, भेंडी ः २०.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com