agriculture news in Marathi 500 ton vegetable remain on field in Nagar district Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला विक्रीच्या प्रतिक्षेत

सुर्यकांत नेटके
मंगळवार, 31 मार्च 2020

बाजार समित्या तसेच वाहतुक बंद असल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि भाजीपाला शेतकऱ्यांना विक्री करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोठ्या शहरात पालिकांच्या मदतीने त्यासाठी जागा उपलब्ध केल्या जात आहेत. अडचण आली तर कृषी विभागाशी संपर्क करता येईल. 
- शिवाजीराव जगताप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर 

नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे विक्री करता न आल्याने नगर जिल्ह्यामध्ये सध्या सुमारे पाचशे टन भाजीपाला शेतात पडून आहे. कृषी विभागाने केलेल्या माहिती संकलनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हा भाजीपाला मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना विक्री करता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून पालिकांच्या मदतीने जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. 

कोरोना व्हारसचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद पाळला जात आहे. सर्व वाहतुक व्यवस्था बंद आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यात सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आठ दिवसांपासून बाजार समित्याही बंद आहेत. त्याचा गंभीर परिणाम भाजीपाला उत्पादकांवर झाला असून भाजीपाला विकता येत नसल्याने तो शेतात सडतो आहे. 

लॉकडाऊन झाल्यापासून नेमका किती भाजीपाला सध्या उपलब्ध आहे याचे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संकलन केले. त्यातुन मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (ता.२८) पर्यंत जिल्हाभरात सुमारे पाचशे टन भाजीपाला सध्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात शेवगा, कोबी, सिमला मिरची, मेथी, टोमॅटो, बटाटे अधिक आहेत. तीन दिवस पावसाचा फटका बसलेल्या तालुक्यातच भाजीपाला उपलब्धतेचे प्रमाण अधिक आहे. 

कृषी विभागाने शेतात पडून असलेला माल शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी नगरसह जिल्ह्यामधील मोठ्या शहरात विक्री करता येणार असून त्यासाठी पालिकांकडून प्रमुख ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तेथील सुरक्षिततेच्या पाश्वभूमीवर पालिकेचे कर्मचारी असतील, असे आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने संपर्क मदत क्रमांक उपलब्ध करुन दिले असून शेतकऱ्यांनी अडचणीच्या वेळी कृषी विभागाच्या ९१७२५२०८८७, ९४२२४४५८११, ९४२१५५८८३४, ९३७०६३८११३, ७०२०८७६५१९, ७५८८०३०७२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. 

विक्रीसाठी उपलब्ध भाजीपाला (टनांत) 
शेवगा ः १८१, कोबी ः १७, फ्लॉवर ः ७, काकडी ः ११, गवार व वाटाना प्रत्येकी ः २, मिरची, दोडका, वाल, कारली प्रत्येकी ः ४, वांगी ः १५, दुधी भोपळा ः ३, वाटाना ः२, लसूण, कांदापात, शेपू, घोसाळे प्रत्येकी ः१, मेथी ः२२, बाटाटे ः१६, आले (आद्रक) ः ५३, ढेमसे ः दिड टन, सिमली मिरची ः २१, हळद, चवळी, गाजर, करडई भाजी, डांगर, धने प्रत्येकी ः ५०० किलो, टोमॅटो ः ३३, भेंडी ः २०. 

 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...