Agriculture news in marathi 500 vehicle Onion incoming in Solapur | Agrowon

सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक, गर्दीमुळे लिलावात अडथळा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

सोलापूर बाजार समितीमध्ये एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले.

सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव गुरुवारी (ता.२) सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले. पण नंतर चर्चेने टप्प्याटप्प्याने लिलाव उरकण्यात आले. दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. 

कोरोनामुळे सध्या लॅाकडाऊन आहे. पण अत्यावश्यक सेवेमुळे बाजार समितीच्या आवारात सध्या भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. पण तेही कांदा सेलहॅालमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून सुरू आहेत. पण बाजार समिती प्रशासन फारशी काळजी घेत असल्याचे दिसत नाही. त्यातच किरकोळ विक्रेतेही बाजार समितीच्या आवारातच गर्दी करत असल्याने आता फक्त भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडत व्यापारी आणि खरेदीदार यांनाच प्रवेश दिला जातो आहे.

किरकोळ विक्रेत्यांची सोय जनावर बाजारावर केली आहे. या कालावधीत कांद्याचे लिलाव मात्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. १ एप्रिलपर्यंत हे लिलाव बंद राहणार होते. त्यानंतर २ एप्रिलपासून हे लिलाव सुरू राहणार होते. त्यानुसार आज लिलाव सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने गर्दी वाढलीच, पण लिलावातही अडथळे येऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत हे लिलाव रोखले. पण चर्चेनंतर पुन्हा सोशल डिस्टंसिंग ठेवत लिलाव सुरू राहिले. आज कांद्याला किमान २०० रुपये केला. सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

१४ एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद 

बाजार समितीचे संचालक मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतील निर्णयानुसार आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव करण्याचे आधी ठरवण्यात आले होते. पण सध्याच्या लॅाकडाऊनच्या परिस्थितीमुळे धोका अधिकच वाढत असल्याने १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...