Agriculture news in marathi 500 vehicle Onion incoming in Solapur | Page 2 ||| Agrowon

सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक, गर्दीमुळे लिलावात अडथळा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

सोलापूर बाजार समितीमध्ये एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले.

सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव गुरुवारी (ता.२) सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले. पण नंतर चर्चेने टप्प्याटप्प्याने लिलाव उरकण्यात आले. दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. 

कोरोनामुळे सध्या लॅाकडाऊन आहे. पण अत्यावश्यक सेवेमुळे बाजार समितीच्या आवारात सध्या भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. पण तेही कांदा सेलहॅालमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून सुरू आहेत. पण बाजार समिती प्रशासन फारशी काळजी घेत असल्याचे दिसत नाही. त्यातच किरकोळ विक्रेतेही बाजार समितीच्या आवारातच गर्दी करत असल्याने आता फक्त भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडत व्यापारी आणि खरेदीदार यांनाच प्रवेश दिला जातो आहे.

किरकोळ विक्रेत्यांची सोय जनावर बाजारावर केली आहे. या कालावधीत कांद्याचे लिलाव मात्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. १ एप्रिलपर्यंत हे लिलाव बंद राहणार होते. त्यानंतर २ एप्रिलपासून हे लिलाव सुरू राहणार होते. त्यानुसार आज लिलाव सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने गर्दी वाढलीच, पण लिलावातही अडथळे येऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत हे लिलाव रोखले. पण चर्चेनंतर पुन्हा सोशल डिस्टंसिंग ठेवत लिलाव सुरू राहिले. आज कांद्याला किमान २०० रुपये केला. सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

१४ एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद 

बाजार समितीचे संचालक मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतील निर्णयानुसार आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव करण्याचे आधी ठरवण्यात आले होते. पण सध्याच्या लॅाकडाऊनच्या परिस्थितीमुळे धोका अधिकच वाढत असल्याने १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत लिंबूच्या दरात किंचित सुधारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरचीला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत दहा ट्रकने...पुणे ः कोरोना टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या पुणे...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत जांभूळ ८००० ते १२००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
पुण्यातील फूलबाजारात फुलांची अत्यल्प आवकपुणे : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन...
राज्यात वांगी १००० ते ४००० रुपये क्विंटलपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, हिरवी मिरचीला उठावसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपुरात मोसंबीच्या दरात चढ-उतार कायम नागपूर  ः मोसंबीची आवक होत असून दर क्‍...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याच्या आवकेत...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादमध्ये मिरची, फ्लॉवर व...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबिर, मेथीला उठाव,...सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ७० ट्रक...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादमध्ये लसूण २४०० ते ६५०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात कांदा आवक कमीच; अपेक्षित...नगर  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे...
परभणीत कैरी २००० ते ४००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
सांगलीत बटाटा १८०० ते २२०० रुपये...सांगली  : येथील विष्णूअण्णा फळे व भाजीपाला...
आटपाडी बाजार समितीत डाळिंब सौदे सुरूआटपाडी, जि. सांगली : येथील बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन आवकेत वाढ, दरात...अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात 'कोरोना’मुळे मंदावली शेतमालाची...नागपूर  ः कोरोना लॉकडाऊनचा परिणाम कळमणा...