नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५ प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५९४० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनीदिली.
5000 to 6875 per quintal of chilli in Nashik
5000 to 6875 per quintal of chilli in Nashik

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५९४० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण आहे. सध्या दरांत सुधारणा आहे. वांग्यांची १३८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १२५० ते २५०० असा दर मिळाला. सरासरी दर १५०० राहिला. फ्लॉवरची आवक २२७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६४२ ते १२५० दर मिळाला. त्यास सरासरी दर ८२५ राहिला. कोबीची आवक ७३८ क्विंटल झाली. तिला ४१५ ते १०४० रूपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८३५ राहिले. 

भोपळ्याची आवक ७०९ क्विंटल होती.त्यास १६६५ ते २६६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७१० राहिला. कारल्याची आवक ४५४ क्विंटल झाली. त्यांना १२५० ते २७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १८७५ राहिला. दोडक्याची आवक ४५ क्विंटल झाली. त्यांना ५८३५ ते ८३३५ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ७०८३ राहिला. गिलक्यांची आवक २७ क्विंटल झाली. त्यांना २०८५ ते २१२५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ८३० राहिला. 

भेंडीची आवक ७३ क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. हिरवी मिरचीची आवक २४८ क्विंटल झाली. तिला ४००० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३०० राहिला. काकडीची आवक ७१३ क्विंटल झाली. तिला १५०० ते २७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २१२५ राहिला. 

कांद्याची आवक १२२५ क्विंटल झाली. त्यास २५० ते ७५० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ५५० राहिला. बटाट्याची आवक ५४५ क्विंटल झाली. तिला १६०० ते २२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १९०० राहिला. लसणाची आवक ५ क्विंटल झाली. तिला ४०० ते १०५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७००० राहिला. 

फळांमध्ये डाळिंबांची आवक १४३ क्विंटल झाली. त्यास ६५० ते ८७६० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. तिला १००० ते ४००० दर राहिला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. टरबुजाची आवक ८० क्विंटल झाली. तिला ५०० ते ९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० रूपये राहिला. 

वेलवर्गीय भाजीपाल्यात तेजी 

सध्या भाजीपाल्याची आवक सर्वसाधारण होत आहे. त्यातच मालाचा उठाव होत आहे. प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाला तेजीत आहे. तर, इतर भाज्या व फळांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ-उतार झाल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com