agriculture news in Marathi 51 bank make agreement for digital sat-bara Maharashtra | Page 2 ||| Agrowon

डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले करार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जून 2021

शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सात-बारा उपक्रमाबाबत महसूल विभागाशी करार करणाऱ्या बॅंकाची संख्या आता ५१ झाली आहे. 

पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सात-बारा उपक्रमाबाबत महसूल विभागाशी करार करणाऱ्या बॅंकाची संख्या आता ५१ झाली आहे. फेरफार व खाते उतारे बँकांना ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेले बँक पोर्टल आता लोकप्रिय होत आहे. राज्यात सध्या विविध बँकांच्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त शाखांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. 

डिजिटल सात-बारा उपक्रमातून मुख्यत्वे शेतकरी वर्गाला पीककर्ज वितरणात सुलभता यावी या उद्देशाने बँकांसोबत महसूल विभागाने चांगला समन्वय ठेवला आहे. सध्या या उपक्रमासाठी https://g२b.mahabhumi.gov.in/banking_application/ वेब पोर्टल विकसित केले जात आहे. 

जमाबंदी आयुक्तालयाच्या ई -फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याकडून या पोर्टलवर जास्तीत जास्त बॅंकांचा लाभ घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे ९ जूनअखेर राज्यातील ५१ बँकांशी संस्थांनी सामंजस्य करार झाले आहेत. 

सहा लाख ९० हजार कागदपत्रे ऑनलाइन 
शासनाशी करार झालेल्या बॅंका आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे, खाते उतारे व फेरफार माहिती ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेत आहेत. या बॅंकांनी शेतकऱ्यांशी संबंधित आतापर्यंत सहा लाख ९० हजार कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून घेतली आहेत. 

जिल्हा बॅंकांचा सहभाग 
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बॅंकांना जमाबंदी आयुक्तालयासोबत करार करावा लागतो. विशेष म्हणजे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंका यात वेगाने सहभागी होत आहेत. आतापर्यंत सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, बुलडाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, बीड, यवतमाळ या जिल्हा बॅंकांचा समावेश आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...