agriculture news in Marathi 51 thousand crore distribute from PM-Kisan Maharashtra | Agrowon

‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार कोटींचे वितरण

कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची (पीएम-किसान) घोषणा केली होती. आतापर्यंत या योजनेंतर्गत देशातील ८.४६ कोटी शेतकऱ्यांना ५० हजार ८५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची (पीएम-किसान) घोषणा केली होती. आतापर्यंत या योजनेंतर्गत देशातील ८.४६ कोटी शेतकऱ्यांना ५० हजार ८५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. 

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम-किसान’ योजना २४ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केलली होती. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती.

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी तीन टप्प्‍यांत दोन हजाराप्रमाणे सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. ‘पीएम-किसान’ योजनेसाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ७५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘पीएम-किसान’ योजनेचा राज्यनिहाय आढावा घेता उत्तर प्रदेशातील सर्वाधिक शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील जवळपास एक कोटी ८८ लाख शेतकरी सहभागी झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील ८५ लाख, बिहारमधील ५४ लाख, राजस्थानमधील ५२ लाख, आंध्र प्रदेशातील ५१ लाख आणि गुजरातमधील ४९ लाख शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत सहभागी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. 

योजनेचा पहिला हप्ता आठ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांना मिळाला, तर दुसरा हप्ता सात कोटी ५९ लाख शेतकऱ्यांना आणि तिसरा हप्ता सहा कोटी २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वीच जमा करण्यात आला आहे. 

देशात एकूण १४ कोटी ५० लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १२ कोटी शेतकरी हे अल्प आणि अल्पभूधारक आहेत. योजना घोषित केली तेव्हा अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश केला होता. त्यानंतर या योजनेची कक्षा वाढवीत जून २०१९ मध्ये सर्वच शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. पंरतु भूमिहीन आणि कर भरणारे शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत.  
 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....