Agriculture news in marathi, 51 Thousands of hectares of crops were destroyed in Beed district | Agrowon

बीड जिल्ह्यात एक्कावन्न हजार हेक्टरवरील पिके सडली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

दोन वर्षांपासून तालुक्यात पाऊस नाही. या वर्षीच्या आशेवर बियाणे, खतांवर खर्च केला. सुरवातीला पाऊस पडला, पण नंतर तो गायब झाला. त्यामुळे पिके दर्जेदार आली नाहीत. किमान खर्च तरी निघाला असता, पण दररोजच्या पावसाने पिके पाण्यात गेली. आमच्यावर आर्थिक संकट आले आहे.

- कृष्णाथ गंडाळ, शेतकरी, झापेवाडी.

शिरूरकासार, जि. बीड :  तालुक्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने पिके होरपळून निघाली. पण, या वर्षी धो धो पाऊस पडत आसल्याने खरीप हांगामातील ५१ हाजार हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्यात सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हातास होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांचे पंचनामे करून सरकार आर्थिक नुकसानभरपाई देणार, या आशेवर शेतकरी दिवस काढत आहेत.

तालुक्यात गत हंगामात पाऊस नसल्याने खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. पाण्याचा, पशुधनाचा प्रश्न गंभीर झाला होता. यंदा खरिपाच्या हंगामात जूनअखेर पाऊस झाल्याने पिकांची पेरणी करून पैसे बियाणे, खतांवर खर्च करून टाकले. पिके चांगली येथील या आशेवर खत, पाण्यावर भरमसाट खर्च केला. पोळ्यानंतर दमदार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. पण, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. कोरडे प्रकल्प, तलाव, नदी-नाले, ओढ्याला पाणी आले.

याशिवाय पिकांना कोंब आले. कपाशीचे मोठे नुकसान झाले. पिकात पाणी साचून शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळ पिके सडत आहेत. 

सर्व खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या विवेचंनेतून कोळवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी हाताश होऊन शेतातील पाण्यात सडत असलेल्या पिकांकडे बघत असल्याचे चित्र आहे. 

पिकांच्या नुकसानीची स्थिती (हेक्टर) 

बाजरी ८००१
मका ८५८
मूग   १०१३
उडीद ७७६
भुईमूग ११९१
तूर  ४१७९
तीळ  १६८
सोयाबीन १६२२
करळ १६३
कापूस ३३७५५
एकूण ५१७२५ हेक्टर 

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...