Agriculture news in marathi 510 complaints of inferior soybean seeds in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याच्या ५१० तक्रारी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या ५१० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने ४५९ तक्रारींची तपासणी केली.

सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या ५१० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने ४५९ तक्रारींची तपासणी केली. त्यापैकी १९३ तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. त्यानुसार फक्त ४८ तक्रारींमध्ये शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले. 

जिल्ह्यात यंदा खरिपात सोयाबीनची सर्वाधिक ५० हजारहून अधिक हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण  सोलापूर या तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. परंतु, यंदा सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या. अनेकठिकाणी बियाणेच उगवले नाही, काही ठिकाणी उगवणक्षमता अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. 

शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे ५१० तक्रारी केल्या. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी तालुकास्तरीय समित्या स्थापून त्यामार्फत ४५९ तक्रारींची पडताळणी केली. त्यानुसार दोष आढळले. त्यानंतर बार्शी तालुक्यात ४४ तक्रारींमध्ये, अक्कलकोट तालुक्यात तीन आणि दक्षिण सोलापुरात एका ठिकाणी बियाणे बदलून देण्यात आल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.

बार्शी तालुक्यातून ४३१ तक्रारी

सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक बार्शी तालुक्यात आहे. त्यामुळे साहजिकच, बार्शी तालुक्यातून अधिक तक्रारी आल्या. बार्शी तालुक्यात सर्वाधिक ४३१, करमाळ्यात २, अक्कलकोट ३५, दक्षिण सोलापूर १८, मोहोळ १४, उत्तर सोलापूर, माढा १ अशा ५१० तक्रारी प्राप्त आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही

जिल्ह्यातून आलेल्या बहुतेक सर्व तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे. त्या-त्या तक्रारीवर शासनाच्या निर्देशानुसार पंचनामे करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. उगवण न झालेल्या बियाण्यांमध्ये महाबीजचे सर्वाधिक बियाणे आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईल, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.


इतर बातम्या
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांसाठी ३१...मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा...पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी...
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत...अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबरपर्यंत...मुंबई : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे...
बाजार समिती आवाराबाहेर सेस वसुलीबाबत...पुणे : बाजार समितीच्या आवाराबाहेर शेती...
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...