agriculture news in Marathi, 52 percent farmers families under debt | Page 2 ||| Agrowon

देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी
वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपयांवर पोचल्याचे दिसत असले तरी त्यापैकी ५२ टक्के कुटुंबं कर्जबाजारी अाहेत, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणासाठी ४० हजार ३२७ कुटुंबांची माहिती घेण्यात आली.

२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपयांवर पोचल्याचे दिसत असले तरी त्यापैकी ५२ टक्के कुटुंबं कर्जबाजारी अाहेत, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणासाठी ४० हजार ३२७ कुटुंबांची माहिती घेण्यात आली.

देशातील ग्रामीण कुटुंबांमध्ये शेतकरी कुटुंबांची संख्या ४८ टक्के आहे. या शेतकरी कुटुंबांना २०१५-१६ या वर्षात पीक लागवड, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, बिगर शेती क्षेत्रातील रोजगार आणि रोजंदारी, मजुरी या स्राेतांमधून वार्षिक सरासरी उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपये मिळाले. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने (एनएसएसओ) २०१२-१३ या वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतकरी कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ७७ हजार ११२ रुपये होते. नाबार्ड आणि एनएसएसओ यांच्या सर्वेक्षणांची तुलना करता २०१२-१३ च्या तुलनेत २०१५-१६ वर्षात शेतकरी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.

नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी कुटुंबामधील कर्जबाजारीपणाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ५२.५ टक्के शेतकरी कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे आढळून आले. बिगरशेतकरी कुटुंबांचा विचार करता ४२.८ कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाले. 

नाबार्डच्या या सर्वेक्षणासाठी देशातील २९ राज्यांतील २४५ जिल्ह्यांतील २०१६ गावांमध्ये जाऊन माहिती घेण्यात आली. एकूण १ लाख ८७ हजार ५१८ लोकांची माहिती संकलित करण्यात आली. 

नाबार्डच्या सर्वेक्षणातील माहिती

  •     शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात तीन वर्षांत १२ टक्के वाढ. पण कर्जबाजारी कुटुंबांची संख्या मोठी.
  •     ८८.१ टक्के ग्रामीण कुटुंबे आणि ५५ टक्के शेतकरी कुटुंबांतील व्यक्तींचे बॅंक खाते आहे. 
  •     शेतकरी कुटुंबांची वार्षिक सरासरी बचतः १७ हजार ४८८ रुपये.
  •     विमा संरक्षण प्राप्त शेतकरी कुटुंबांची संख्याः २६ टक्के
  •     निवृत्तीवेतन योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकरी कुटुंबांची संख्याः २०.१ टक्के

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...