Agriculture news in Marathi 53 Sugar Factories in the list of 'Tagging' Reduction Initiatives | Page 2 ||| Agrowon

‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर कारखाने

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने यंदा लागू केलेल्या ‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘टॅगिंग’ संमतीसाठी या कारखान्यांच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. 

पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने यंदा लागू केलेल्या ‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘टॅगिंग’ संमतीसाठी या कारखान्यांच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. 

शासकीय भागभांडवल, शासकीय कर्जे आणि हमीशुल्कापोटी या कारखान्यांकडे थकीत असलेली देणी वसूल करण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अंकन (टॅगिग) नियमावलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे या साखर कारखान्यांना कर्ज देणाऱ्या बॅंका आता त्यांच्या कर्जाची वसुली करताना सरकारी थकीत देणीच्या रकमादेखील कापून घेणार आहेत. साखर विक्री करताना कारखान्यांना मिळणाऱ्या रकमेतून ही कपात होईल. 

‘‘टॅगिंगचे नियोजन करताना संबंधित कारखान्यांनी वाटलेले रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) पाहून साखर आयुक्तालयाने दोन याद्या तयार केल्या आहेत. 

३१ ऑगस्ट २०२१ अखेर पूर्ण एफआरपी देणारे कारखाने ‘अ’ यादीत असतील. त्यांना साखरेच्या प्रतिक्विंटलवर ५० रुपये टॅगिंग असेल, तर ३१ ऑगस्टअखेर पूर्ण एफआरपी न दिलेले कारखाने ‘ब’ यादीत असून, त्यांना २५ रुपये टॅगिंग द्यावे लागेल. टॅगिंग आदेशाची अंमलबजावणी संबंधित बॅंका करणार आहेत. या प्रक्रियेवर प्रादेशिक सहसंचालक लक्ष ठेवतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

५० रुपये टॅगिंग कपात असलेले कारखाने
कोल्हापूर ः कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना (ससाका), सदाशिवराव मंडलीक ससाका, दौलत ससाका (भाडेतत्त्वावर सध्या अथर्व इंटर ट्रेडकडे). सांगली ः सर्वोदय ससाका, राजे विजयसिंह डफळे- राजारामबापू पाटील युनिट ४, वसंतदादा ससाका (भाडेतत्त्वावर सध्या दत्त इंडियाकडे), विश्‍वासराव नाईक ससाका, मोहनराव शिंदे ससाका. सातारा ः रयत ससाका (भाडेतत्त्वावर सध्या अथनी शुगरकडे), श्रीराम ससाका (भाडेतत्त्वावर सध्या जवाहर शेतकी ससाकाकडे). पुणे ः कर्मयोगी शंकरराव पाटील ससाका, संत तुकाराम ससाका, राजगड ससाका. उस्मानाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ससाका, शिवशक्ती शेतकी ससाका. नगर ः अगस्ती ससाका, वृद्धेश्‍वर ससाका, केदारेश्‍वर ससाका, भाऊसाहेब थोरात ससाका, साईकृपा. नाशिक ः वसंतदादा वसाका. औरंगाबाद ः शरद ससाका, संत एकनाथ ससाका. जालना ः सागर ससाका, रामेश्‍वर ससाका. बीड ः सुंदरराव सोळंके ससाका, छत्रपती ससाका, जयभवानी ससाका, अंबाजोगाई ससाका. हिंगोली ः पूर्णा ससाका, टोकाई ससाका. लातूर ः रेणा ससाका.

२५ रुपये टॅगिंग कपात असलेले कारखाने
कोल्हापूर ः अजरा ससाका, अप्पासाहेब नलावडे ससाका. पुणे ः छत्रपती ससाका. सातारा ः किसनवीर ससाका. सोलापूर ः संत दामाजी ससाका, विठ्ठल ससाका, मकाई ससाका, संत कुर्मदास ससाका, भीमा ससाका, वसंतराव काळे ससाका, सांगोला तालुका ससाका. नंदूरबार ः सातपुडा ससाका, आदिवासी ससाका. बीड ः वैद्यनाथ ससाका. हिंगोली ः मराठवाडा कळमनुरी ससाका. नांदेड ः शंकर ससाका.

एफआरपीनुसार दोन याद्या
राज्यात साखर कारखान्यांनी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे भांडवल तसेच हमी प्राप्त केली आहे. मात्र ती देणी वर्षानुवर्षे थकीत ठेवण्यात आल्याने आता २०२१-२२ च्या गाळप हंगामात साखर विक्री करताना ‘टॅगिंग’ उपक्रम राबवून या थकीत रकमा वसूल केल्या जातील. 
 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...