agriculture news in Marathi 53 Thousand crop insurance Complaints in Nanded Maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पिकविम्यासंबंधी ५३ हजार तक्रारी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जानेवारी 2021

अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६७ हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला होता.

नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६७ हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला होता. यानंतर ज्या शेतकऱ्यांना दावा दाखल करुनही विमा मिळाला नाही तसेच इतरही शेतकऱ्यांना नुकसानीबाबत भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी विमा कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहेत.  

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आणि  ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून ७२ तासाच्या आत वैयक्तीक दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. परंतु यात अनेकांनी दावा करुनही विमा मिळाला नाही, अशी तक्रार होती. तसेच अनेकांनी कंपनीचा संपर्क लागला नसल्यामुळे तक्रारी करता आल्या नाहीत.

यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यानुसार जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत अर्ज सादर केले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३९, सोळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ८०१ तर विमा कंपनीकडे ५१ हजार ९०५ अर्ज आल्याची माहिती मिळाली.

आपत्ती काळातील आठ हजार तक्रारी
जिल्ह्यातून तक्रारींचा ओघ सुरु झाल्यानंतर मदत न मिळालेल्या तक्रारीत पाच हजार ७४७ अर्जांचा समावेश आहे. क्रॉप इन्शुरंस ॲपवर ६३०, टोलफ्री क्रमांकावर १४७०, मेलवर तारीख नसलेले २३० अशा आठ हजार तक्रारींचा समावेश आहे. तर नैसर्गिक आपत्ती काळात तक्रार न केलेले ४३ हजार ९९८ अर्ज मिळाल्याची माहिती कंपनीकडून मिळाली.

पीकविम्याची स्थिती

दाखल दावे : ७३ हजार
शेतकऱ्यांना भरपाई : ६७,६२२
भरपाई रक्कम : ६४ कोटी


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...