कापूस विक्रीसाठी परभणी जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

परभणी : यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या जिल्ह्यातील परभणी , पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ५३ हजार ४०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
 53,000 farmers in Parbhani district registered for sale of cotton
53,000 farmers in Parbhani district registered for sale of cotton

परभणी : यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या जिल्ह्यातील परभणी , पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ५३ हजार ४०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. www.parbhani.gov.in/cotton या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी रविवारी (ता.६) पर्यंतची मुदत होती. विहित कालावधीत परभणी बाजार समितीअंतर्गत १२ हजार १८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

पाथरी बाजार समितीअंतर्गत ८ हजार ६०५, सोनपेठ बाजार समितीअंतर्गत ९ हजार १२८, गंगाखेड बाजार समितीअंतर्गत १६ हजार ३७०, पालम बाजार समितीअंतर्गत ७ हजार ११६, अशी एकूण ५३ हजार ४०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. अनेक शेतकऱ्यांनी दोन, तीनवेळा नोंदणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या निश्चित होईल. टोकन दिल्यानंतर महासंघातर्फे खरेदी होईल. 

एका दिवशी ४० क्विंटलच कापूस खरेदी 

एका दिवशी एका शेतकऱ्याचा ४० क्विंटल कापूस खरेदी केला जाईल. चार चाकी वाहनातील कापूस स्वीकारला जाईल. संदेश प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत कापूस विक्रीस आणणे बंधनकारक आहे. तोंडावर मास्कचा वापर करावा, असे आवाहन यंत्रणेतर्फे करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com