Agriculture news in marathi, In 531 villages of Marathwada, water shortage in the wards continued | Agrowon

मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत पाणीटंचाई कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान अजूनही टॅंकरवरच अवलंबून आहे. १२ लाख ५७ हजार ५२५ लोकांची तहान टॅंकशिवाय भागत नाही. सर्वाधिक ४१३ टॅंकर बीड जिल्ह्यात सुरू असून त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात १३७ टॅंकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्तांना पाणी पुरविले जात आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान अजूनही टॅंकरवरच अवलंबून आहे. १२ लाख ५७ हजार ५२५ लोकांची तहान टॅंकशिवाय भागत नाही. सर्वाधिक ४१३ टॅंकर बीड जिल्ह्यात सुरू असून त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात १३७ टॅंकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्तांना पाणी पुरविले जात आहे. 

पावसाळ्याचा निर्धारित कालावधी संपला असला, तरी मराठवाड्यातील बहुतांश जलस्रोत अजूनही तहानलेलेच आहेत. अनेक भागांत भूगर्भात झिरपण्याइतपत पाणी न झाल्याने अजूनही विहिरी, कुपनलिकांना पाणी आले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती संपूर्ण पावसाळाभर सुरूच आहे. वार्षिक सरासरीच्या ८९ टक्‍के पाऊस झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ४७ गावांत अजूनही टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. गंगापूर तालुक्‍यातील ४१ व पैठण तालुक्‍यातील ६ गावांचा पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. या गावांमधील ९९ हजार ९७४ लोकांसाठी ३४ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. 

बीड जिल्ह्यातील २५८ गावे व ८८ वाड्यांना पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावत आहे. या गावे, वाड्यांमधील तब्बल ७ लाख १४ हजार ४७४ लोकांसमोर पाण्याचा प्रश्‍न आहे. तो सोडविण्यासाठी ४१३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सरासरी ६१ टक्‍केच पाऊस झाला. जो मराठवाड्यात सर्वात कमी आहे. आष्टी, पाटोदा, केज, बीड, अंबाजोगाई, शिरूर, धारूर आदी तालुक्‍यांतील गावात, पाटोदा, केज, आष्टी, शिरूर, परळी, वडवणी आदी नगर परिषदांच्या शहरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

लातूर जिल्ह्यातील ३४ गावे, एका वाडीमधील ९१ हजार १९० लोकांना पाणीटंचाई सतावते आहे. या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६९ टक्‍के पाऊस झाला आहे. येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ९४ गावे, ९ वाड्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्‍न आहे. ३ लाख ५१ हजार ८८७ लोकांसाठी १३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६९ टक्‍केच पाऊस झाला आहे. 

१३३६ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांतील १३२६ विहिरींचे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, बीडमधील ४४८, लातूरमधील २८१ व उस्मानाबादमधील ५८९ विहिरींचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही,...नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या...
शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, '...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा...जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या...मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना...
रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे...रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा...सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `...अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना...
...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट...पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील...
रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ...रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात...
जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी...जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील...
नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर...नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात...
सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के...गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...