कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज वाटप
यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली असून, पीककर्ज वाटपाची स्थितीही चांगली आहे. हंगामात यंदा सुमारे ९० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे.
अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली असून, पीककर्ज वाटपाची स्थितीही चांगली आहे. हंगामात यंदा सुमारे ९० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. ६० कोटींच्या उद्दिष्टांपैकी ५४ कोटी रुपये वाटप करण्यात बँकांना यश मिळाले.
यंदा डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापर्यंत रब्बी लागवड जेमतेम ४० टक्के झाली होती. नंतर मात्र, वेगाने लागवड झाली. त्यामुळेच जिल्ह्यात हरभरा, गहू लागवड नियोजित क्षेत्रापेक्षा १०० टक्के क्षेत्रावर झाली आहे. यापैकी हरभरा काढणीचा हंगामही सुरू झालेला आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी नियोजनानुसार साडेसात हजार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वितरण्याचे उद्दिष्टं ठेवण्यात आले होते. बँकांनी ऑक्टोबरपासून पीककर्ज वाटप सुरू केले. त्यामुळे हंगामात ७ हजार ५०० शेतकऱ्यांपैकी ५ हजार ७०० शेतकऱ्यांना ५४ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले, अशी माहिती लिड बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया यांनी व्यक्त केला.
हंगामात यंदा सरासरी १७ हजार २०५ हेक्टरच्या तुलनेत १९ हजार ४५० हेक्टरवर गव्हाची लागवड झाली आहे. तर हरभऱ्याची ९० हजार हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १०४ टक्के म्हणजेच ९३ हजार ५१४ हेक्टरवर लागवड झाली. पीककर्ज माफीमुळे कर्जखाती निल झाल्याने रब्बीत पीककर्ज वाटपाला गती मिळाली. त्यामुळेच हंगामात ९० टक्के पीक कर्ज वाटप होऊ शकले.
पीककर्ज वाटप स्थिती
- शेतकरी ः ५७०७
- रक्कम ः ५४ कोटी
- लक्ष्यांक ः ६० कोटी
- टक्केवारी ः ९०
पेरणी झालेले पिकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- गहू ः १९,४१५
- हरभरा ः ९३,५१४
- 1 of 1098
- ››