सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी ५४१ जणांना मिळाली परवानगी 

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी ५४१ नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
migrant
migrant

सोलापूर: राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी ५४१ नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंजाबमधील कपूरथळा येथूनही दहा नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid१९.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे. 

एक मे पासून आजपर्यंत १६०७४ अर्ज प्राप्त झाले असून १५९५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. ४३१७ अर्जांना परवानगी नाकारली असून, १०१६२ अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने अर्ज प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, जिल्ह्यात येऊ इच्छणाऱ्या ५४१ मध्ये जालना जिल्ह्यातून १२ बीडमधून १४ , गडचिरोली १२, धुळे १०, कोल्हापूर ४८०, नागपूर १३ कपूरथळा, पंजाबमधून १० जणांनी अर्ज केले आहेत.  परजिल्ह्यात जाण्यासाठी ५७५९ अर्ज  सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण ५७५९ नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी २३११ जणांनी अर्ज केले आहेत. इतर काही प्रमुख जिल्ह्यात नावे आणि अर्ज केलेल्या नागरिकांची संख्या पुढीलप्रमाणे - नगर -१४१, औरंगाबाद - ११४, बीड-१६०, कोल्हापूर -२२४, लातूर -१२४, मुंबई शहर-९२, मुंबई उपनगर-८६, नांदेड-१५८, उस्मानाबाद -१७७, सांगली -२९७, सातारा -२२३, रायगड -१७१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com