Agriculture news in Marathi 55 lakh quintals of sugar in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची गती, उपलब्ध यंत्रणा व शिल्लक ऊस याची विचार करता गाळप हंगाम लांबणार आहे. सध्या १४ साखर कारखाने उसाचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून ४७ लाख ४९ हजार ६५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५५ लाख १४ हजार ८१५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याच्या उताऱ्यात सुधारणा झाल्याने सध्या सरासरी ११.६१ टक्के उतारा मिळत आहे.

सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची गती, उपलब्ध यंत्रणा व शिल्लक ऊस याची विचार करता गाळप हंगाम लांबणार आहे. सध्या १४ साखर कारखाने उसाचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून ४७ लाख ४९ हजार ६५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५५ लाख १४ हजार ८१५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याच्या उताऱ्यात सुधारणा झाल्याने सध्या सरासरी ११.६१ टक्के उतारा मिळत आहे.

जिल्ह्यात उशिरा सुरू झालेला गाळपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पक्व झालेल्या उसाची तोडणी तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त उशीराने होत आहे. याचा फायदा तोडणी मजूर उचलत असून शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीसाठी बेहिशेबी पैसे घेतले जाते आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांकडून ४७ लाख ४९ हजार ६५७ टन उसाचे गाळप करून ५५ लाख १४ हजार ८१५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. उशिरा ऊस तूट असल्याने उताऱ्यात सुधारणा होऊ लागल्याने सध्या सरासरी ११.६१ टक्के उतारा मिळत आहे. 

जिल्ह्यात ऊस गाळप, साखर निर्मिती व साखर उताऱ्यात कृष्णा कारखान्यांची आघाडी कायम आहे. या कारख्याने सर्वाधिक सहा लाख ६६ हजार ५९० मेट्रिक टन ऊसगाळप केले आहे. तसेच या कारखान्यांचा साखर उताराही सर्वाधिक १२.६२ टक्के येत आहे. दरात मात्र सह्याद्री कारखान्यांची आघाडी असून या कारखान्याने प्रतिटन दोन हजार ८५५ रुपये दर दिला आहे. सहकारी साखर कारखान्यांकडून जास्त गाळप केले गेले आहे. सहकारी सात कारखान्याने २५ लाख ३८ हजार ६३४ मेट्रिक टन ऊस गाळप करत ३० लाख ५१ हजार ३७० साखरनिर्मिती केली आहे. तर सात खासगी कारखान्यांकडून २२ लाख ११ हजार २३ मेट्रिक टन गाळपाद्वारे २४ लाख ६३ हजार ४४५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. 

सहकारी कारखान्यांच्या तुलनेत खासगी कारखान्यांचा साखर उतारा कमी मिळत आहे. परिणामी साखर निर्मितीही कमी होत आहे.  सध्या सुरू असलेल्या गाळपाची गती, उपलब्ध यंत्रणा व शिल्लक ऊस याचा विचार करता गाळप हंगाम लांबणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...