तेवीस कारखान्यांकडून ५५ लाख टन गाळप

तेवीस कारखान्यांकडून ५५ लाख टन गाळप
तेवीस कारखान्यांकडून ५५ लाख टन गाळप

औरंगाबाद : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन मिळून पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी २९ जानेवारीअखेरपर्यंत ५५ लाख ५० हजार ५१० टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ५५ लाख ७७ हजार ५५९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. या सर्व साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.०५ टक्‍के राहिल्याची माहिती माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सहकारी व तीन खासगी मिळून पाच साखर कारखाने यंदा उसाचे गाळप करताहेत. या पाचही कारखान्यांनी १० लाख ४२ हजार ३४१ टन उसाचे गाळप करत १० लाख ६५ हजार ६६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.२२ टक्‍के राहिला. 

जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच साखर कारखान्यांनी १३ लाख ३७ हजार ३२७ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून १४ लाख ०६ हजार ९१० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५२ टक्‍के राहिला. 

बीड जिल्ह्यातील सहकारी पाच व खासगी दोन मिळून सात साखर कारखान्यांनी यंदा गाळपात सहभाग नोंदविला. या सातही कारखान्यांनी २१ लाख ६२ हजार टन उसाचे गाळप करत २१ लाख २१ हजार ७० क्‍विंटल साखर उत्पादन केले. या सातही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्‍के राहिला. 

जळगाव जिल्ह्यातील एक सहकारी व दोन खासगी साखर कारखान्यांनी ३ लाख ७७५ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.३४ टक्‍के साखर उताऱ्यानुसार २ लाख ८० हजार ८०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 

नंदूरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एका खासगी साखर कारखान्याने ७ लाख ७ हजार ४३२ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.९४ टक्‍के सरासरी साखर उताऱ्यानुसार नंदूरबार जिल्ह्यातील तीनही साखर कारखान्यांनी ७ लाख ३ हजार ११९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com