Agriculture news in marathi 55 projects in Marathwada are dry | Agrowon

मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेच

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

औरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या प्रकल्पांत पाणी आणले. परंतु, मराठवाड्यातील ८७३ पैकी ५५ लघु मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाकच आहेत. १२१ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

उपलब्ध उपयुक्‍त पाणीसाठ्यामुळे गरज भागणार असे वाटत असले, तरी पाण्याचा कार्यक्षम व गरज असेल त्याच ठिकाणी योग्य प्रमाणात वापर करण्याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मराठवाड्यात लहान मोठे ८७३ पाणीसाठे आहेत. त्यामधील ११ मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या ८५.५३ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे.

औरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या प्रकल्पांत पाणी आणले. परंतु, मराठवाड्यातील ८७३ पैकी ५५ लघु मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाकच आहेत. १२१ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

उपलब्ध उपयुक्‍त पाणीसाठ्यामुळे गरज भागणार असे वाटत असले, तरी पाण्याचा कार्यक्षम व गरज असेल त्याच ठिकाणी योग्य प्रमाणात वापर करण्याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मराठवाड्यात लहान मोठे ८७३ पाणीसाठे आहेत. त्यामधील ११ मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या ८५.५३ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे.

दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांत ५४.२५ टक्‍के, ७४९ लघु प्रकल्पांत ४६.८३ टक्‍के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ९३.९१ टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमध्ये ६३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील मांजरा व उस्मानाबाद सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही.

दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १ व बीड जिल्ह्यातील तीन मिळून चार प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. तर, औरंगाबाद, लातूर  जिल्ह्यांतील प्रत्येकी २, बीड जिल्ह्यातील एक व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ अशा ९ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी ५१ प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १८, जालना २, बीड १९, लातूर ७, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. 

दुसरीकडे ११२ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९, जालना व बीड प्रत्येकी १७, लातूर ३४, उस्मानाबाद २९, नांदेड ५ व परभणी जिल्ह्यातील एका लघु प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.

३१९ लघु प्रकल्पांत ७५ टक्के पाणी

मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ३१९ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४४, जालना १५, बीड ५१, लातूर ५४, उस्मानाबाद ७१, नांदेड ६०, परभणी ६ व हिंगोली जिल्ह्यातील  १८ समावेश आहे. ६९ लघु प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, ७४ लघु प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के पाणीसाठा आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...