agriculture news in marathi 55% in Satara district Summer sowing on the field | Page 3 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पेरणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४ हेक्‍टर म्हणजेच ५५.७४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४ हेक्‍टर म्हणजेच ५५.७४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमूग व मका पिकांची पेरणी झाली आहे. माण तालुक्‍यात सर्वाधिक उन्हाळी पेरणी झाली आहे, अशी नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाकडून जिल्ह्यात ५६५८ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ३१५४ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मक्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. मक्याचे १७४२ हेक्टर सर्वसधारण क्षेत्र आहे. त्यापैकी १६८६ हेक्टर म्हणजेच ९६.७९ टक्के पेरणी झाली आहे.

भुईमूग पिकांची संथगतीने पेरणी सुरू आहे. भुईमूग पिकांचे ३९१६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १४६८ हेक्टर म्हणजेच ३७.४९ टक्के पेरणी झाली आहे. 

दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पाणी शिल्लक आहे. त्यातच मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. परिणामी, उन्हाळी पिकांना दिलासा मिळत आहे. सध्या पिकांची अवस्था चांगली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आणखीन निधी ः...मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व...
खरिपापूर्वी कृषी विक्रेत्यांना कोरोना...नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन...
धान बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ः...भंडारा : महाविकास आघाडी शेतकरी हितासाठी बांधील...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
पांदण रस्ता मोकळा करा, अन्यथा...नागपूर : शेतापर्यंत जाणारी वाट एका शेतकऱ्याने...
जैविक उत्पादनांच्या बाजारपेठेला फटका...पुणे : राज्यातील जैविक खते व जैव उत्तेजकांच्या...
सातारा जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकरी...सातारा : जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, माण...
जालना जिल्ह्यात तेरा हजार क्‍विंटल...जालना : जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने खरेदी...
अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे हवे ६० हजार...अकोला ः जिल्ह्यात यंदा सोयाबीन व कपाशीच्या...
वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरीअकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी...
नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी...नाशिक : जिल्ह्यात विविध भागांत तुरळक पूर्वमोसमी...
सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात या वर्षी विक्रमी...
प्रत्यक्षात तक्रारदारच नसल्याची माहिती...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो...
रत्नागिरीत २३ हजार क्विंटल भात खरेदीरत्नागिरी ः महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह...
आटपाडी तालुक्यातील अनेक गावांत गारपीटआटपाडी, जि. सांगली : तालुक्‍यात बुधवार (ता.१४)...
‘चित्री’ प्रकल्पात पाण्याची उपलब्धता...आजरा, जि कोल्हापूर : ‘चित्री’ प्रकल्पामध्ये...
जळगाव जिल्हा बँकेचे पीककर्ज रोखीने...जळगाव ः जिल्ह्यात पीककर्ज वितरणात आघाडीवर...
केंद्रीय जैव उत्तेजके समितीची स्थापना पुणे : जैव उत्तेजके किंवा ‘पीजीपी’ (प्लांट ग्रोध...
कोकणातून हापूसच्या ३४ हजार पेट्या रवानारत्नागिरी ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून...