कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
बातम्या
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पेरणी
सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४ हेक्टर म्हणजेच ५५.७४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४ हेक्टर म्हणजेच ५५.७४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमूग व मका पिकांची पेरणी झाली आहे. माण तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी पेरणी झाली आहे, अशी नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
कृषी विभागाकडून जिल्ह्यात ५६५८ हेक्टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ३१५४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मक्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. मक्याचे १७४२ हेक्टर सर्वसधारण क्षेत्र आहे. त्यापैकी १६८६ हेक्टर म्हणजेच ९६.७९ टक्के पेरणी झाली आहे.
भुईमूग पिकांची संथगतीने पेरणी सुरू आहे. भुईमूग पिकांचे ३९१६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १४६८ हेक्टर म्हणजेच ३७.४९ टक्के पेरणी झाली आहे.
दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पाणी शिल्लक आहे. त्यातच मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. परिणामी, उन्हाळी पिकांना दिलासा मिळत आहे. सध्या पिकांची अवस्था चांगली आहे.
- 1 of 1590
- ››