Agriculture news in Marathi 55% sugarcane cultivation in Pune division | Agrowon

पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू व खोडवा उसाच्या १३ जानेवारीपर्यंत एकूण दोन लाख तीन हजार ५४२ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या असल्याचे समोर आले आहे.

पुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे ऊस लागवडी वेळेवर सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उसाच्या लवकर आणि वेळेत लागवडी सुरू केल्या आहेत. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू व खोडवा उसाच्या १३ जानेवारीपर्यंत एकूण दोन लाख तीन हजार ५४२ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी उशिराने पाऊस झाल्याने लागवडीही उशिराने सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या नसल्याची स्थिती होती. गेल्या वर्षी याच काळात १० जानेवारी पर्यंत एकूण ८० हजार ९९५ हेक्टर म्हणजेच २० टक्के ऊस लागवडी झाल्या होत्या. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ झाल्याने पुढील वर्षी गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.

चांगल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पिकांकडे वळू लागले आहेत. इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. त्यातच कोरोनामुळे भाजीपाला व इतर पिकांचे दर घसरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी उसाकडे वळल्याचे दिसून येते. जून, जुलै महिन्यांत पावसाचा थोडाफार खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. परतीच्या पावसामुळे शेतकरी ऊस पीक लागवडीकडे वळाला आहे.

जिल्हानिहाय आडसाली ऊस लागवड (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र लागवड टक्के
नगर १,०२,६१३ ५७,६२५ ५६
पुणे १,३०,६३१ ५७,४२४ ४४
सोलापूर १,३७,५३६ ८८,४९३ ६४
एकूण ३,७०,७८१ २,०३,५४२ ५५

 


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...