agriculture news in marathi 552 new corona patient admitted; twelve lost their life in state | Agrowon

राज्यात ५५२ नवे रूग्ण; विविध ठिकाणी बाराजणांचा मृत्यू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

राज्यभरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबरोबरच बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, आत्तापर्यंत एकूण ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात रविवारी (ता.१९) ५५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील बारा कोरोनाबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई : राज्यभरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबरोबरच बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, आत्तापर्यंत एकूण ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात रविवारी (ता.१९) ५५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील बारा कोरोनाबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील एकूण बाधितांची संख्या चार हजार दोनशेच्या पुढे गेली आहे. रविवारी मरण पावलेल्यांमध्ये मुंबई येथील सहा आणि मालेगाव येथील चार, सोलापूरमधील एक, नगर जिल्ह्यातील जामखेडमधील एकाचा समावेश आहे.

रविवारी मरण पावलेल्यांमध्ये चार पुरुष आणि आठ महिला आहेत. या बाराजणांपैकी सहा रूग्ण हे साठ वर्षे आणि त्यावरील असून पाच रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर ४ हजार २०० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येईल. राज्यात सध्या ३६८ कंटेन्मेंट झोन असून आत्तापर्यंत एकूण ६ हजार ३५९ सर्वेक्षण पथकांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...