नगर जिल्ह्यात एका दिवसात ५६ नव्या छावण्यांना मंजुरी

नगर जिल्ह्यात एका दिवसात ५६ नव्या छावण्यांना मंजुरी
नगर जिल्ह्यात एका दिवसात ५६ नव्या छावण्यांना मंजुरी

नगर : दुष्काळाच्या स्थितीत पशुधन जगविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी (ता. ६) नव्याने ५६ चाराछावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. जिल्ह्यातील छावण्यांची संख्या आता १२३ झाली आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता, अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. 

दुष्काळामुळे सध्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी चाराटंचाईचेही संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात लहान-मोठ्या जनावरांची संख्या २८ लाखांपर्यंत असून, हे पशुधन पाहता, चारा छावण्यांची तातडीने गरज निर्माण झाली आहे. मागील महिनाभरात चाराछावण्यांसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल होऊ लागले होते. अटी व शर्तींची पूर्तता पाहून यापूर्वी ६७ छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 

नव्याने दाखल झालेल्या परिपूर्ण ५६ प्रस्तावांना बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. जिल्हाभर दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पशुधन जगवण्याचे चिंता असताना उशिराने का होईना छावण्या सुरू होत आहेत. आतापर्यंत पाथर्डी तालुक्यात जनावरांच्या छावण्यांना सर्वाधिक मंजुरी दिली आहे. मात्र, दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आणि तीव्र दुष्काळ जाहीर झालेला असतानाही अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यांत मात्र अजून एकही छावणी नाही. त्या भागातून प्रस्तावही आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. छावणी सुरू करण्यास विलंब केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सहा संस्थांची परवानगी रद्द केली.

तालुकानिहाय छावण्या  पाथर्डी -४६, कर्जत -१५ , जामखेड -१७, नगर -१२ , पारनेर -०७ , शेवगाव -१८  श्रीगोंदे -०८ 

बुधवारी मंजुरी मिळालेली ठिकाणे  पिंपळगाव माळवी, कापूरवाडी, साकत खुर्द, जेऊर, रुईछत्तिशी, चिचोंडी पाटील (सर्व नगर), घुटेवाडीत व कोळगावात प्रत्येकी दोन (सर्व श्रीगोंदे), भैरोबावाडी, खुरंगेवाडी (सर्व कर्जत), बोधेगाव, ढोरजळगाव, ठाकूर पिंपळगाव, माळेगाव-ने, सालवडगाव, वाघोली, आखतवाडे, खरडगाव, आव्हाणे खुर्द, गरडवाडी, वडुले खुर्द, शेवगाव, नांदूरविहिरे (सर्व शेवगाव), सुपे, लोणी हवेली (सर्व पारनेर), चौंडी, डिसलेवाडी, राजेवाडी, बावी, हळगाव, सरदवाडी, कुसडगाव, नान्नज, फक्राबाद, मुंजेवाडी, धानोरे-वंजारवाडी (सर्व जामखेड), रेणुकाईवाडी, शिंगवे केशव, रांजणी, भालगाव, पालवेवाडी, सोमठाणे खुर्द, चितळवाडी, पागोरी पिंपळगाव, करंजी, खांडगाव, जोहरवाडी, शिरापूर, राघो हिवरे, वैजूबाभूळगाव, शिराळ, मांडवे, मोहोज देवढे, माणिकदौंडी (सर्व पाथर्डी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com