सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी रुपये

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजनेंअंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७८ हजार ७३५ कर्ज खाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.
567 crore for Solapur district
567 crore for Solapur district

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजनेंअंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७८ हजार ७३५ कर्ज खाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यांपैकी ७१ हजार ६६० कर्ज खाती संबंधित बँकांकडे प्राप्त झाली आहेत. ६९ हजार २३७ कर्ज खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांपैकी ६३ हजार ५७६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये ५६७.४६ कोटी रुपये जमा करण्यात आले.

शासनाच्या निर्णयानुसार योजनेच्या लाभार्थ्यांना बँकांनी नव्याने पीक कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. शासन निर्णय २२ मे २०२० अन्वये, ज्या लाभार्थ्यींची नावे सदर योजनेअंतर्गत शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये आहेत, परंतु, कोविड १९ (कोरोना विषाणू) मुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या कर्ज खात्यावर अद्यापपर्यंत योजनेअंतर्गत शासनाकडून लाभ वितरीत करण्यात आला नाही. परंतु, शासनाने आता रखडेलली ही कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली  आहे.  

पीक कर्जवाटप बंधनकारक

जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ९ हजार ४७२ शेतकऱ्यांना १४३८.५२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५० हजार ८५ शेतकऱ्यांना ७५७.२९ कोटी रुपये पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ५२.६४ टक्के कर्जवाटप झाले आहे. बँकांनी नियमित कर्जदारांसोबतच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र व इच्छुक लाभार्थ्यांना सुध्दा नव्याने पीक कर्ज वितरण करणे अनिवार्य व बंधनकारक आहे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

तहसिल कार्यालयाकडे करा तक्रार  

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना व ज्यांची नावे शासनाकडून प्राप्त यादीमध्ये सामाविष्ठ आहेत, अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांना पीक कर्ज हवे असल्यास त्यांनी नजीकच्या बँक शाखेमध्ये परिपूर्ण पीक कर्ज मागणी अर्ज दाखल करावा. संबंधित बँकेकडून नियमानुसार पीक कर्ज वितरण न झाल्यास अथवा कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय झाल्यास संबधित तहसिलदार अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com