Agriculture news in marathi 567 crore for Solapur district | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजनेंअंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७८ हजार ७३५ कर्ज खाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजनेंअंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७८ हजार ७३५ कर्ज खाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यांपैकी ७१ हजार ६६० कर्ज खाती संबंधित बँकांकडे प्राप्त झाली आहेत. ६९ हजार २३७ कर्ज खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांपैकी ६३ हजार ५७६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये ५६७.४६ कोटी रुपये जमा करण्यात आले.

शासनाच्या निर्णयानुसार योजनेच्या लाभार्थ्यांना बँकांनी नव्याने पीक कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. शासन निर्णय २२ मे २०२० अन्वये, ज्या लाभार्थ्यींची नावे सदर योजनेअंतर्गत शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये आहेत, परंतु, कोविड १९ (कोरोना विषाणू) मुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या कर्ज खात्यावर अद्यापपर्यंत योजनेअंतर्गत शासनाकडून लाभ वितरीत करण्यात आला नाही. परंतु, शासनाने आता रखडेलली ही कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली 
आहे.  

पीक कर्जवाटप बंधनकारक

जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ९ हजार ४७२ शेतकऱ्यांना १४३८.५२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५० हजार ८५ शेतकऱ्यांना ७५७.२९ कोटी रुपये पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ५२.६४ टक्के कर्जवाटप झाले आहे. बँकांनी नियमित कर्जदारांसोबतच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र व इच्छुक लाभार्थ्यांना सुध्दा नव्याने पीक कर्ज वितरण करणे अनिवार्य व बंधनकारक आहे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

तहसिल कार्यालयाकडे करा तक्रार  

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना व ज्यांची नावे शासनाकडून प्राप्त यादीमध्ये सामाविष्ठ आहेत, अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांना पीक कर्ज हवे असल्यास त्यांनी नजीकच्या बँक शाखेमध्ये परिपूर्ण पीक कर्ज मागणी अर्ज दाखल करावा. संबंधित बँकेकडून नियमानुसार पीक कर्ज वितरण न झाल्यास अथवा कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय झाल्यास संबधित तहसिलदार अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...