यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे कोरडवाहू पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन
ताज्या घडामोडी
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी ५६९ कोटी
कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी व १५७ कोटी रुपयांचे पीक नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी व १५७ कोटी रुपयांचे पीक नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
याशिवाय, पूणर्ता आणि अंशता पडझड झालेल्या घरांसाठी ११० कोटी ५८ लाख रुपये मिळतील. ही सर्व रक्कम संबंधित नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाईल. जिल्ह्यात सुमारे ७८ हजार हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. पूर्णता नुकसान झालेल्या पिकांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी होईल. तसेच, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, पण अतिवृष्टी किंवा पुरामुळे नुकसान झाले, अशांना १५७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल. देसाई यांनी याबाबतचे अंतिम मान्यता व सहमती पत्र राज्य शासनाला दिले.
नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचा समावेश आहे. नदीकाठच्या शेतातील सर्व पिके २० ते २२ दिवस पाण्याखाली होती. त्यामुळे त्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा पिकांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. याशिवाय, ज्यांच्या शेतात पाणी आले, पण त्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यांना नुकसानीच्या तिपटीने भरपाई दिली जाणार आहे.
पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४१ हजार ५१४ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ९ हजार ५४६ घरांची पूर्णत: आणि ३१ हजार ८७२ घरांची अशंत: पडझड झाली. यासाठी ११० कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मागविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे काही दिवसांतच शासनाकडून पूरग्रस्तांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती मिळाली.
- 1 of 1027
- ››