Agriculture news in marathi 569 crore for loss of agriculture, houses in Kolhapur district | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी ५६९ कोटी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी व १५७ कोटी रुपयांचे पीक नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी व १५७ कोटी रुपयांचे पीक नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

याशिवाय, पूणर्ता आणि अंशता पडझड झालेल्या घरांसाठी ११० कोटी ५८ लाख रुपये मिळतील. ही सर्व रक्कम संबंधित नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाईल. जिल्ह्यात सुमारे ७८ हजार हेक्‍टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. पूर्णता नुकसान झालेल्या पिकांना ३०२ कोटी रुपयांची कर्जमाफी होईल. तसेच, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, पण अतिवृष्टी किंवा पुरामुळे नुकसान झाले, अशांना १५७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल. देसाई यांनी याबाबतचे अंतिम मान्यता व सहमती पत्र राज्य शासनाला दिले. 

नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचा समावेश आहे. नदीकाठच्या शेतातील सर्व पिके २० ते २२ दिवस पाण्याखाली होती. त्यामुळे त्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा पिकांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. याशिवाय, ज्यांच्या शेतात पाणी आले, पण त्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यांना नुकसानीच्या तिपटीने भरपाई दिली जाणार आहे. 
पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४१ हजार ५१४ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ९ हजार ५४६ घरांची पूर्णत: आणि ३१ हजार ८७२ घरांची अशंत: पडझड झाली. यासाठी ११० कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मागविण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे काही दिवसांतच शासनाकडून पूरग्रस्तांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...