सांगलीत खरिपाची ५७ टक्के पेरणी

सांगली : जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला. खरीप हंगामातील पेरणी १ लाख ५९ हजार ४८७ हेक्टरवर म्हणजे ५७ टक्के झाली आहे. सर्वाधिक पेरा उडदाचा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
57 percent sowing of kharif in Sangli
57 percent sowing of kharif in Sangli

सांगली : जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला. खरीप हंगामातील पेरणी १ लाख ५९ हजार ४८७ हेक्टरवर म्हणजे ५७ टक्के झाली आहे. सर्वाधिक पेरा उडदाचा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यात प्रामुख्याने उडीद आणि तुरीचे सर्वाधिक क्षेत्र असते. उडदाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५१ हेक्टर आहे.

यंदाच्या हंगामात ४ हजार ७४४ हेक्टरवर उडदाचा पेरा झाला आहे. तुरीचा पेरा ५३ टक्के इतका झाला असून तुरीच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्यता आहे. दुष्काळी पट्ट्यात सूर्यफूलाची देखील लागवड केली जाते. परंतु, सूर्यफूलाची अवघी ५ टक्के लागवड झाली आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मुळात, पलूस तालुक्यात आगाप सोयाबीनची पेरणी होते. प्रामुख्याने वाळवा तालुका सोयाबीन उत्पादनासाठी अग्रेसर आहे. परंतु, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यंदा बियाण्यांची उपलब्धता कमी भासण्याची शक्यता होती. पण, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८६ हजार ५६० हेक्टर असून २८ हजार ३५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ५० टक्केच पेरा झाला आहे.  तालुकानिहाय पेरणी क्षेत्र 

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
मिरज ५४७० 
जत ४३८८८ 
खानापूर ११४४९ 
वाळवा २४९१५ 
तासगाव २३०६० 
आटपाडी ४६६९ 
कवठेमहांकाळ १०७३४ 
पलूस १९९९ 
कडेगाव १०२५३
एकूण १,५९,४८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com