Agriculture news in marathi 57 percent sowing of kharif in Sangli | Agrowon

सांगलीत खरिपाची ५७ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

सांगली : जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला. खरीप हंगामातील पेरणी १ लाख ५९ हजार ४८७ हेक्टरवर म्हणजे ५७ टक्के झाली आहे. सर्वाधिक पेरा उडदाचा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली : जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला. खरीप हंगामातील पेरणी १ लाख ५९ हजार ४८७ हेक्टरवर म्हणजे ५७ टक्के झाली आहे. सर्वाधिक पेरा उडदाचा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यात प्रामुख्याने उडीद आणि तुरीचे सर्वाधिक क्षेत्र असते. उडदाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५१ हेक्टर आहे.

यंदाच्या हंगामात ४ हजार ७४४ हेक्टरवर उडदाचा पेरा झाला आहे. तुरीचा पेरा ५३ टक्के इतका झाला असून तुरीच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्यता आहे. दुष्काळी पट्ट्यात सूर्यफूलाची देखील लागवड केली जाते. परंतु, सूर्यफूलाची अवघी ५ टक्के लागवड झाली आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मुळात, पलूस तालुक्यात आगाप सोयाबीनची पेरणी होते. प्रामुख्याने वाळवा तालुका सोयाबीन उत्पादनासाठी अग्रेसर आहे. परंतु, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यंदा बियाण्यांची उपलब्धता कमी भासण्याची शक्यता होती. पण, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८६ हजार ५६० हेक्टर असून २८ हजार ३५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ५० टक्केच पेरा झाला आहे. 

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र 

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
मिरज ५४७० 
जत ४३८८८ 
खानापूर ११४४९ 
वाळवा २४९१५ 
तासगाव २३०६० 
आटपाडी ४६६९ 
कवठेमहांकाळ १०७३४ 
पलूस १९९९ 
कडेगाव १०२५३
एकूण १,५९,४८७

 


इतर बातम्या
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...