agriculture news in marathi 57% rainfall in Jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला आहे. मात्र जिल्ह्यातील नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे विहिरी व कूपनलिकेची पातळी अद्यापही खालावलेली आहे. 

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला आहे. मात्र जिल्ह्यातील नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे विहिरी व कूपनलिकेची पातळी अद्यापही खालावलेली आहे. 

जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तापीला महापूर आला होता. असे असले तरी नद्या अद्यापही दुथडी वाहत नसल्याचे चित्र आहे. नाले कोरडे आहेत. पावसाचे पाणी गावागावांत मुरलेले नाही. त्यामुळे गावागावांतील विहिरी, कूपनलिका यांची पातळी खोलच आहे. 

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे वर्षभरात जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर या चार महिन्यांत भूजल सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यातील १७८ ठिकाणच्या विहिरींवर सर्वेक्षण केले जाते. त्यात पातळी किती उंचावली आहे किंवा घटली आहे, याची माहिती मिळते. भूजल सर्वेक्षण विभागातर्फे भूजल पातळी मोजण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी असला तरी विविध गावांतील विहिरी, कूपनलिका यांचे सर्वेक्षण केले असता विहिरींच्या पातळीत तसेच बोरवेलच्या पातळीत वाढ झालेली नाही.
 
१०८.८ मिलिमीटर पाऊस 

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आतापर्यंत १०८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर आहे. तर जूनचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मि.मी, जुलै १८९.२ मि.मी, ऑगस्ट १९६.१ मि.मी, तर सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १२३.६ मि.मी असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मि.मी आहे. जुलैचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मि.मी आहे. या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात १०८.८ मि.मी म्हणजेच जुलैच्या सरासरीच्या ५७.५ टक्के इतका पाऊस पडला आहे. 

जुलैतील तालुकानिहाय पाऊस 

जळगाव- ९७.७ मि.मी (४४.६ टक्के), भुसावळ- ६०.०० मि.मी (३०.८), यावल- ७६ मि.मी (३७.१), रावेर- १०७.८ मि.मी (५८.९), मुक्ताईनगर- १०१.२ मि.मी (५७.५), अमळनेर- ८७.४ मि.मी (४६.६), चोपडा- ९०.५ मि.मी (४२.३), एरंडोल- १६७.५ मि.मी (८७.४), पारोळा- १३८.६ मि.मी (७६), चाळीसगाव- १४४.७ मि.मी (९१.८), जामनेर- ११३.१ मि.मी, (५७.२), पाचोरा- ११५.३ मि.मी (६४), भडगाव- ११५.८ मि.मी (६६.९) धरणगाव- १२८.५ मि.मी (५६.७), बोदवड- ८९.३ मि.मी (४३.९) या प्रमाणे जिल्ह्यात एकूण १०८.८ मिमी म्हणजेच ५७.५ टक्के पाऊस झाला.

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये भूजल सर्वेक्षण केले जाते. यामुळे किती पाणीपातळी वाढली आहे, याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. सप्टेंबरनंतर पातळीतील वाढीची माहिती मिळेल. 
- डॉ. अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जळगाव.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...