कृत्रिम पावसासाठी ३५ दिवसांत ५७९ नळकांड्यांचा धुरळा

कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस

औरंगाबाद: सार्वत्रिक नसला तरी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या परतीच्या पावसाच्या जोरातच सुरू असलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगात पावसायोग्य ढगांवर गेल्या ३५ दिवसांत जवळपास ५७९ नळकांड्यांचा धुरळा झाला आहे. या प्रयत्नात पाऊस किती पडला याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र प्रयोगासाठीच्या विमानाने आजवर मेघबीजरोपणासाठी केलेल्या उड्डाणाची व्याप्ती जवळपास ११ जिल्ह्यांपर्यंतच्या नभातील पावसायोग्य ढगांपर्यंत राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  हो नाही म्हणत मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत विभागीय आयुक्‍तालयाच्या छतावर कृत्रिम  पावसाच्या प्रयोगासाठी अत्यंत आवश्‍यक असे डॉप्लर रडार बसविण्यात आले. ९ ऑगस्टला प्रत्यक्ष प्रयोगासाठी म्हणून विमानाने आकाशात उड्डान घेतले. परंतू मेघबीजारोपण न करता विमान परत आले. तेव्हापासून आजपर्यंत औरंगाबाद, जालना, नगर, बीड, परभणी, बुलडाणा, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, खानदेशातील जळगाव व विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील पावणेतीनशेपेक्षा जास्त  ठिकाणच्या नभात पावसायोग्य ढगावर विमानाने बीजारोपण केले. त्यासाठी जवळपास ५७९ नळकांड्यां(फ्लेअर्स)चा वापर करण्यात आला. परंतू या प्रयत्नाच्या माध्यमातून पाउस किती पडला याची आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज होणाऱ्या प्रयोगाची इत्यंभूत माहिती ही मंत्रालयात थेट पाठविली जात आहे.  सुरवातील सप्टेबर अखेरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे व गरजेनुसार आणखी पंधरवडा त्यामध्ये वाढ केली जाण्याचे प्रयोगापूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट‌ करण्यात आले होते. आजच्या घडीला जोवर पावसायोग्य ढग असतील तोवर हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी जवळपास तीस कोटीचा निधी मंजूर केला आहे. या प्रयोगासाठी या प्रयोगाचे काम करणाऱ्या कंपनीसोबत अमेरिकेतील तज्ज्ञ कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर काम करते आहेत. त्याला भारतातील तज्ज्ञांचीही मदत मिळते आहे.  आजवरच्या प्रयोगाच्या कालावधीत २६ सप्टेबरपर्यंत ३५ दिवस पावसायोग्य ढगांवर नळकांड्यांच्या (फ्लेअर्स) साहाय्याने बीजारोपण करण्यात आले. याशिवाय चार दिवस देखभाल दुरुस्तीसाठी विमानाला आराम करावा लागला. तर तीन वेळा पावसायोग्य ढगच न मिळाल्याने विमानाला खाली हात परतावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com