दक्षिण सोलापूरमधील ५८ गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणी सुरू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५८ गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूरमधील ५८ गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणी सुरू In 58 villages in South Solapur Start counting land by drone
दक्षिण सोलापूरमधील ५८ गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणी सुरू In 58 villages in South Solapur Start counting land by drone

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५८ गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले.

येळेगाव येथील सीमांकन करून या कामाची सुरुवात करण्यात आली. ३१ एप्रिलअखेर तालुक्यातील ५८ गावांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जरग यांनी सांगितले. गावठाण भूमापन योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन चुना पावडरच्या साहाय्याने वेळेवर करून घ्यावे. सार्वजनिक मिळकती आणि रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, योग्य माहिती पुरवावी, असे आवाहन ही जरग यांनी केले आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहनही जरग यांनी केले आहे.

मोजणी करण्यात येणारी गावे अकोले मंद्रूप, अंत्रोळी, आलेगाव आहेरवाडी, औज आहेरवाडी, इंगळगी, खानापूर, उळेवाडी, गावडेवाडी, कर्देहळ्ळी, कणबस, कुडल, तेलगाव मंद्रूप, गुंजेगाव, चंद्रहाळ, चिंचपूर, लिंबी चिंचोळी, तिर्थ, तिल्लेहाळ, तोगराळी, दर्गनहळ्ळी, दिंडुर, दोड्डी, नांदणी, बंकलगी, बंदलगी, बरूर, बाळगी,  बिरनाळ, बोळकवठे, बोरूळ, मनगोळी, कुरघोट, मंद्रे, यत्नाळ, येळेगाव, राजूर, रामपूर, लवंगी, वरळेगाव, वडापूर, वडगाव, वडकबाळ, वडजी, वांगी, सिंदखेड, शिर्पनहळ्ळी, शिरवळ, संगदरी, संजवाड, सादेपूर, सावतखेड, हत्तरसंग, हिपळे, बक्षीहिप्परगे, होनमुर्गी, औज मंद्रूप, कारकल, कुसूर.

ग्रामस्थांसाठी सूचना

  •     ग्रामसभेत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
  •     ग्रामपंचायत अभिलेख्यामध्ये मिळकती संदर्भात नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.
  •     ग्रामसेवकास संपर्कासाठी मोबाइल क्रमांक द्यावा.
  •     गावातील मिळकतधारकांना माहिती द्यावी.
  •     मिळकतीचे योग्य ते सीमांकन करून घ्यावे.
  •     सीमांकनाबाबत वाद असल्यास ही बाब ग्रामसेवक, भूमापक 
  •     यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
  •     सार्वजनिक, शासकीय आणि ग्रामपंचायत मिळकतींचे सीमांकन करण्यास सहकार्य करावे. 
  •     सार्वजनिक मालमत्तेवर कोणी हक्क सांगत असल्यास कळवावे.
  •     मालकी हक्काच्या चौकशीवेळी पुराव्याची कागदपत्रे सादर करावी.
  •     न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती द्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com